Supriya Sule : आम्हाला काहीही लपवण्याची गरजच नाही; रोहित पवारांच्या प्रश्नावर सुप्रिया सुळे यांचे उत्तर

एमपीसी न्यूज : आमच्या कुटुंबातील कोणालाही नोटीस आली तरी आमची नेहमीच सहकार्याची भूमिका राहिली आहे, असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केले. पुण्यातील कोथरूड परिसरात महागाई विरोधात सहभागी झालेल्या सुप्रिया सुळे पत्रकारांशी बोलत होत्या. सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांना रोहित पवारांच्या चौकशी विषयी चर्चा सुरू असल्याचा बाबतीत प्रश्न विचारला होता. त्यावर त्यांनी उत्तर दिले.
सुप्रिया सुळे म्हणाल्या, अद्याप तरी रोहित पवार यांची कोणतीही चौकशी सुरू झालेली नाही. फक्त माध्यमातूनच अशा प्रकारच्या बातम्या सुरू आहेत. मी रोहित पवार यांच्याशी बोलले आहे. त्यांना अद्याप नोटीस आली नाही. मात्र, आमच्यापैकी कोणालाही नोटीस आली तर आमची भूमिका नेहमीच सहकार्याची राहिलेली आहे. माझा न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे. त्यामुळे आम्हाला काहीही लपवण्याची गरज नाही. चौकशी झाली तर आम्ही त्याला सामोरे जाऊ आणि उत्तर देऊ असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.

मनसेकडून वसंत मोरे यांना बारामती लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी देण्यात आली. त्याविषयी विचारले असता सुप्रिया सुळे म्हणाल्या, मनसेने देखील त्यांच्या पक्षाचा प्रचार करावा. आम्हाला काहीच अडचण नाही. माझ्या मतदारसंघावर माझे प्रचंड प्रेम आहे. त्यामुळे जो लोकप्रतिनिधी या मतदार संघाला पुढे घेऊन जाईल त्याला न्याय मिळालाच पाहिजे. याशिवाय बारामती सगळ्यांनाच हवीहवीशी वाटते हे याचेच प्रमाणपत्र असल्याचा टोला देखील त्यांनी मनसेसह (Supriya Sule) भाजपला लगावला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.