Suresh Raina : सोळाव्या वर्षी क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या सुरेश रैनाच्या नावावर आजही आहेत ‘हे’ विक्रम

Suresh Raina, who made his cricketing debut at the age of 16, still holds these records.

एमपीसी न्यूज – धोनीपाठोपाठ भारतीय क्रिकेट संघाचा अष्टपैलू खेळाडू सुरेश रैना यानंदेखील आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. सुरेश रैनानं आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरूनच आपली निवृत्ती जाहीर केली आहे. 2018 मध्ये रैना आपला अखेरचा एकदिवसीय सामना खेळला होता. तर 2015 मध्ये तो अखेरचा कसोटी सामना खेळला.

रैनानं आतापर्यंत भारतासाठी 18 कसोटी सामने, 226 एकदिवसीय सामने आणि 78 T20 सामने खेळले आहेत. तर त्याच्या नावावर एकदिवसीय सामन्यांमध्ये 5,615 धावा आहेत.

तर त्यानं एकदिवसीय सामन्यांमध्ये 36 विकेट्सही घेतल्या आहेत. तर त्यानं आतापर्यंत 18 कसोटी सामन्यांमध्ये 768 धावा आणि 13 विकेट्स आणि T20 सामन्यांमध्ये 1,605 धावा केल्या आहेत.

* सुरेश रैनाच्या नावावर खालील विक्रम आहेत *

रैना तिन्ही फॉरमॅटमध्ये शतक ठोकणारा पहिला भारतीय फलंदाज ठरला होता. हाँगकाँगविरुद्ध सामन्यात त्याने पहिले वनडे शतक तर श्रीलंकेविरुद्ध पहिले कसोटी शतक झळकावले.

2010 टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेत क्रिकेटच्या सर्वात छोट्या स्वरूपात दक्षिण आफ्रिकाविरूद्ध त्याने पहिले शतक झळकावले होते. टी -20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये शतक झळकावणारा तो भारताचा पहिला खेळाडू होता. इतकेच नाही तर पदार्पण कसोटीत रैनाने शतक झळकावले होते.

शिवाय, रैनाने आयपीएलमध्ये देखील एक शतक ठोकले आहेत. रैनाने आपल्या कसोटी कारकीर्दीची सुरुवात शानदार पद्धतीने केली, पण तो भारताकडून अधिक कसोटी सामने खेळू शकला नाही.

टी-20 विश्वचषक आणि वनडे विश्वचषकात शतक झळकावणारा रैना हा भारताचा एकमेव फलंदाज आहे. रैनानंतर आजवर कोणत्याही भारतीय फलंदाजाने ही आश्चर्यकारक कामगिरी केलेले नाही.

रैना सर्वाधिक आयपीएल सामने खेळणारा खेळाडू असून आतापर्यंत रैनाने आयपीएलमध्ये 192 सामने खेळले आहेत. येत्या हंगामात तो 200 सामन्यांचा आकडा पार करेल.

धोनी आणि रैना आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाले असले तरी दोघे आयपीएल खेळत राहतील. रैना आणि धोनी 19 सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या आयपीएल स्पर्धेत खेळताना दिसतील.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.