Pune corona update: 1049 नागरिक कोरोनामुक्त, 835 नवे रुग्ण, 46 जणांचा मृत्यू

विशेष म्हणजे आजही रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्यांचे प्रमाण जास्त आहे. : 1049 civilians coronated, 835 new patients, 46 deaths

एमपीसी न्यूज – पुणे शहरात कोरोनाचे संकट आटोक्यात येत असून, सोमवारी तब्बल 1049 नागरिक या आजारातून मुक्त झाले. विशेष म्हणजे आजही रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्यांचे प्रमाण जास्त आहे. 4 हजार 635 कोरोनाच्या चाचण्या करण्यात आल्या. त्यामध्ये 835 नवे रुग्ण आढळले. 46 जणांचा मृत्यू झाला.

765 क्रिटिकल रुग्ण असून, त्यात 464 जण व्हेंटिलेटरवर आहेत. कोरोनाचे पुणे शहरात 74 हजार 933 रुग्ण झाले आहेत. 58 हजार 706 रुग्णांनी वेळीच उपचार घेतल्याने कोरोनावर मात केली आहे.

आतापर्यंत या कोरोनामुळे 1 हजार 785 नागरिकांचा मृत्यू झाला आहे. 14 हजार 442 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत, अशी माहिती पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागातर्फे देण्यात आली आहे.

बिबवेवाडीतील 51 वर्षीय पुरुषाचा, येरवड्यातील 50 वर्षीय पुरुषाचा, हडपसरमधील 65 वर्षीय आणि 43 वर्षीय महिलेचा, धानोरीतील 72 वर्षीय पुरुषाचा, रविवार पेठेतील 75 वर्षीय पुरुषाचा ससून हॉस्पिटलमध्ये, गणेश पेठेतील 48 वर्षीय पुरुषाचा, शंकर नगरमधील 84 वर्षीय पुरुषाचा भारती हॉस्पिटलमध्ये, खराडीतील 61 वर्षीय पुरुषाचा मीरा हॉस्पिटलमध्ये कोरोनामुळे मृत्यू झाला.

कोथरूडमधील 84 वर्षीय पुरुषाचा, वडगाव बुद्रुकमधील 82 वर्षीय पुरुषाचा, संगमवाडीतील 64 वर्षीय पुरुषाचा, कात्रजमधील 64 वर्षीय पुरुषाचा, बिबवेवाडीतील 51 वर्षीय पुरुषाचा, गणेश पेठेतील 71 वर्षीय पुरुषाचा, वडगावमधील 77 वर्षीय पुरुषाचा, कसबा पेठेतील 72 वर्षीय महिलेचा, शनिवार पेठेतील 55 वर्षीय महिलेचा, सदाशिव पेठेतील 73 वर्षीय महिलेचा, शिवाजी नगरमधील 75 वर्षीय महिलेचा दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला.

कसबा पेठेतील 68 वर्षीय पुरुषाचा, धनकवडीतील 56 वर्षीय पुरुषाचा सह्याद्री हॉस्पिटलमध्ये, हडपसरमधील 77 वर्षीय महिलेचा लोटस हॉस्पिटलमध्ये, घोरपडी गावातील 38 वर्षीय पुरुषाचा नोबेल हॉस्पिटलमध्ये, वारजेतील 69 वर्षीय पुरुषाचा माई मंगेशकर हॉस्पिटलमध्ये, वडगावशेरीमधील 64 वर्षीय पुरुषाचा रुबी हॉल क्लिनिकमध्ये, कर्वेनगरमधील 66 वर्षीय पुरुषाचा देवयानी हॉस्पिटलमध्ये, गुरुवार पेठेतील 76 वर्षीय पुरुषाचा रांका हॉस्पिटलमध्ये, धनकवडीतील 57 वर्षीय महिलेचा सह्याद्री हॉस्पिटलमध्ये कोरोनामुळे मृत्यू झाला.

बिबवेवाडीतील 68 वर्षीय पुरुषाचा नोबेल हॉस्पिटलमध्ये, गुलटेकडीतील 70 वर्षीय महिलेचा रुबी हॉल क्लिनिकमध्ये, कात्रजमधील 55 वर्षीय पुरुषाचा ओ अँड पी हॉस्पिटलमध्ये, लोहगावमधील 40 वर्षीय पुरुषाचा, कोथरूडमधील 52 वर्षीय महिलेचा, वडगांवशेरीमधील 78 वर्षीय महिलेचा, लोहगावमधील 54 वर्षीय पुरुषाचा बुधराणी हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला.

मुकुंद नगरमधील 88 वर्षीय पुरुषाचा पुना हॉस्पिटलमध्ये, धानोरीतील 65 वर्षीय पुरुषाचा, विमान नगरमधील 68 वर्षीय महिलेचा आणि 82 वर्षीय पुरुषाचा जहांगीर हॉस्पिटलमध्ये, कोंढाव्यातील 54 वर्षीय पुरुषाचा भारती हॉस्पिटलमध्ये, हडपसरमधील 33 वर्षीय महिलेचा ताराचंद हॉस्पिटलमध्ये, खराडीतील 73 वर्षीय पुरुषाचा रायसिंग मेडिकेअर हॉस्पिटलमध्ये, औंधमधील 62 वर्षीय पुरुषाचा डी. एच. मध्ये, उंडरीमधील 81 वर्षीय पुरुषाचा, शिवाजी नगरमधील 75 वर्षीय महिलेचा नायडू हॉस्पिटलमध्ये कोरोनामुळे मृत्यू झाला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.