Talegaon Dabhade : माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांची मावळमध्ये अचानक भेट

माळी समजाच्या प्रमुखांशी चर्चा

एमपीसी न्यूज- महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी रविवारी सकाळी तळेगाव येथे अचानक भेट देऊन मावळ तालुक्यातील माळी समाजाच्या प्रमुख व्यक्तींशी चर्चा केली. दरम्यान भुजबळ यांच्या या अचानक भेटीने चर्चेला उधाण आले असून, ही भेट केवळ समता परिषद उभारणीबाबत असल्याची माहिती एका पदाधिकाऱ्याने दिली.

रविवारी सकाळी 11 वाजता तळेगाव येथे समता परिषदेच्या महिला अध्यक्षा स्नेहलता बाळसराफ यांच्या निवासस्थानी छगन भुजबळ यांनी सदिच्छा भेट दिली. अनेक वर्षांनंतर भुजबळांनी दिलेल्या या गुप्त भेटीबद्दल तालुक्यात चांगलीच चर्चा रंगली असून या भेटीबाबत राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांना अनभिज्ञ ठेवण्यात आले होते.

राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य डॉ दत्तात्रय बाळसराफ, समता परिषदेचे जिल्हाध्यक्ष बापु भुजबळ, पिंपरी चिंचवडचे शहराध्यक्ष चंद्रशेखर भुजबळ, महिला अध्यक्ष स्नेहलता बाळसराफ, महात्मा फुले मंडळाचे अध्यक्ष हनुमंत माळी, विश्वास राऊत, उद्योजक संजय माळी, डॉ आदित्य नाले आदींनी भुजबळ यांचे स्वागत केले.

यावेळी अभिनेते डॉ आप्पा बोराटे, डॉ कृष्णकांत वाढोकर, माजी सरपंच विनायक भुजबळ, उद्योजक रोहित गिरमे, दिलीप आरू, स्वप्नील भुजबळ, काळुराम गायकवाड, अजय गिरमे, स्वप्नील माळी, युवराज हिंगणे आदींसह माळी समाजाचे प्रमुख उपस्थित होते. या प्रसंगी भुजबळ यांच्या हस्ते देहूच्या नवनिर्वाचित सरपंच ज्योती टिळेकर यांचा सत्कार करण्यात आला. भुजबळ यांनी यावेळी मावळ तालुक्यासह संपूर्ण पुणे जिल्ह्यात समता परिषद ही संघटना बळकट करण्याचे आवाहन केले.

समता परिषदेची कार्यकारणी लवकरच जाहीर करणार

तालुक्यात समता परिषदेची नवीन कार्यकारणी जाहीर करून संघटना सक्रिय करण्यासाठीच्या सूचना भुजबळ यांनी दिल्या. दरम्यान या भेटीमुळे तालुक्यातील माळी समजामध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.