T20 World Cup: यावर्षी T20 विश्वचषक भरवणे अशक्य, ‘क्रिकेट ऑस्ट्रेलिया’च्या अध्यक्षांचे स्पष्टीकरण

T20 World Cup: Impossible to host T20 World Cup this year, explains Cricket Australia president जगातील सर्वच देशात कोरोनाचा उद्रेक दिसून येत आहे आणि अशा वेळी विश्वचषक भरवणे अवघड असल्याचे त्यांनी सांगितले.

एमपीसी न्यूज- ‘क्रिकेट ऑस्ट्रेलिया’चे अध्यक्ष अर्ल एडिंग्ज यांनी यावर्षीच्या T20 विश्वचषक बाबत बोलताना मोठं विधान केल आहे. जगभरात सुरु असलेल्या कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर यावर्षी ऑस्ट्रेलियात विश्वचषक भरवणे अशक्य असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

T20 विश्वचषकाबाबत 10 जून रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेट समितीच्या बैठकीत कोणताही ठोस निर्णय झाला नाही. यासंबंधित निर्णय जुलै महिन्यात घेतला जाणार असल्याचे समितीकडून सांगण्यात आले आहे.

दरम्यान, ‘क्रिकेट ऑस्ट्रेलिया’चे अध्यक्ष अर्ल एडिंग्ज यांनी यावर्षीच्या T20 विश्वचषका बाबत बोलताना कोरोना पार्श्वभूमीवर हे शक्य नसल्याचे सांगितले आहे.

या वर्षीच्या T20 विश्वचषकाचे आयोजन ऑक्टोबर 18 ते नोव्हेंबर 15 दरम्यान ऑस्ट्रेलिया मध्ये करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

एडिंग्ज हे ‘क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या आयोजित व्हिडिओ कॉन्फरेन्स मध्ये बोलताना म्हणाले की, विश्वचषक रद्द करण्याबाबत अजून काही निर्णय झाला नसला तरी कोरोना पार्श्वभूमीवर 16 देशातील खेळाडूंना ऑस्ट्रलयात बोलावून विश्वचषक खेळवणे जवळजवळ अशक्य आहे.

जगातील सर्वच देशात कोरोनाचा उद्रेक दिसून येत आहे आणि अशा वेळी विश्वचषक भरवणे अवघड असल्याचे त्यांनी सांगितले.

T20 विश्वचषकाबाबत अद्याप कोणताही निर्णय झाला नसला तरी ICC कडे हा निर्णय विचाराधीन आहे. कोरोना विषाणूच्या वाढत्या पार्श्वभूमीवर ऑस्ट्रेलियन सरकारने 30 सप्टेंबर पर्यंत लॉकडाउनची घोषणा केली आहे.

त्यामुळे आगामी काळात T20 विश्वचषकाबाबत कोणता निर्णय घेतला जाणार याकडे क्रिकेट रसिकांचे लक्ष लागून राहिले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.