Maval : दोन हजारांची लाच घेताना तलाठी अटक

एमपीसी न्युज – जमिनीचा सातबारा उताऱ्यावर नोंद करण्यासाठी 2 हजारांची लाच मागणा-या तलाठ्यास अटक करण्यात आली आहे. संजय राजाराम कांबळे (वय 55, रा. सजा वडेश्वर) असे अटक करण्यात आलेल्या तलाठ्याचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदाराने खरेदी केलेल्या जमिनीचा सातबारा नोंदवण्यासाठी तलाठी संजय कांबळे यांनी त्यांच्याकडे 5 हजार रुपयांची मागणी केली होती. याबद्दल तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार नोंदवली होती.

या तक्रारीची 1 जुलै 2017 रोजी पडताळणी केली असता तडजोडीअंती 2 हजार रुपयांची लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. याप्रकरणी आज वडगाव मावळ पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी संजय कांबळे यांना अटक
करण्यात आली आहे.

ही कारवाई पोलीस उप आयुक संदीप दिवाण यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.