Talavade Crime News : भरधाव कंटेनरची दुचाकीला धडक; महिलेचा मृत्यू

एमपीसी न्यूज – भरधाव ट्रकने दुचाकीला पाठीमागून जोरात धडक दिली. यामध्ये दुचाकीवरून जाणा-या पतीला गंभीर दुखापत झाली. तर पत्नीचा मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी (दि. 17) दुपारी साडेचार वाजताच्या सुमारास तळवडे येथील कॅनबे चौकात घडली.

शालिनी ज्ञानेश्वर उढाणे (वय 45)असे मृत्यू झालेल्या पत्नीचे नाव आहे. तर ज्ञानेश्वर तुकाराम उढाणे हे जखमी झाले आहेत. त्यांनी याबाबत देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार कंटेनर ट्रक (आर जे 49 / जी ए 2579) चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी दुपारी साडेचार वाजताच्या सुमारास फिर्यादी ज्ञानेश्वर आणि त्यांच्या पत्नी शालिनी दुचाकीवरून देहू-आळंदी रोडने जात होते. ते कॅनबे चौक, तळवडे येथे आले असता भरधाव वेगात आलेल्या एका कंटेनरने फिर्यादी यांच्या दुचाकीला पाठीमागून जोरात धडक दिली. त्यात फिर्यादी जखमी झाले. तर त्यांच्या पत्नीचा मृत्यू झाला. देहूरोड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.