Talegaon : गणेश प्रतिष्ठान तर्फै तळेगाव येथे रविवारपासून व्याख्यानमालेचे आयोजन

एमपीसी न्यूज – गणेश प्रतिष्ठान तर्फै तीन दिवसीय गणेश व्याख्यानमालेचे आयोजन रविवारपासून (दि.१५) तळेगाव स्टेशन येथे करण्यात आले आहे. तळेगाव स्टेशन येथील गणेश मंदिर प्रांगणात दररोज सायंकाळी साडेसहा वाजता विविध विषयावर व्याख्यान होणार आहे. या व्याख्यानमालेचे उद्घाटन आमदार सुनील शेळके यांच्या हस्ते होणार आहे.

गणेश व्याख्यानमालेच्या पहिल्या दिवशी ‘आनंदाच्या वाटा’ या विषयावर ज्येष्ठ व्याख्याते डॉ. संजय कळमकर मार्गदर्शन करणार आहेत. यावेळी माजी सभापती अशोक काळोखे अध्यक्षस्थानी राहणार असून नगरसेविका नीता काळोखे आणि ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष विठ्ठल कांबळे यांची उपस्थिती राहील.

_MPC_DIR_MPU_II

व्याख्यानमालेचे दुसरे पुष्प पुणे येथील महाराष्ट्र साहित्य परिषदचे कार्याध्यक्ष डॉ. मिलिंद जोशी ‘प्रश्न आजचे… उत्तर संतसाहित्याचे!’ या विषयावर द्वितीय पुष्प गुंफणार असून नगरसेविका काजल गटे अध्यक्षपद भूषवणार आहेत. तसेच उद्योजक प्रदीप गटे, संतसाहित्याचे अभ्यासक किरण परळीकर, व्याख्याते राजेंद्र घावटे उपस्थित राहणार आहेत.

व्याख्यानमालेत शेवटच्या दिवशी प्रसिद्ध राशीभविष्यकार विश्वास पटवर्धन आपल्या ‘स्वभाव राशींचे’ या एकपात्री विनोदी कार्यक्रम होणार आहे. याप्रसंगी युवा उद्योजक चिराग खांडगे यांची अध्यक्ष म्हणून तर ज्येष्ठ समाजसेविका ऊर्मिला छाजेड यांची प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थिती राहणार आहे.

गणेश व्याख्यानमालेचे हे आठवे वर्ष असून विनाशुल्क असलेल्या या व्याख्यानमालेचा सर्व नागरिकांनी आवर्जून उपस्थीत राहण्याचे आवाहन गणेश प्रतिष्ठानचे अध्यक्ष महादेव वर्तले आणि सचिव दिलीप राजगुरव यांनी केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.