Talegaon : वराळे गावात आढळले खवल्या मांजर

एमपीसी न्यूज – तळेगाव जवळील वराळे गावात अतिशय दुर्मिळ (Talegaon)असलेले खवल्या मांजर आढळले. वन्यजीव रक्षक मावळ संस्थेच्या सदस्यांनी त्या मांजराला पकडून त्याची तपासणी करत नैसर्गिक अधिवासात सुखरूपपणे सोडून दिले.

वराळे गावच्या हाद्दीतील समता कॅालनी येथील शशिकांत रमेश गिरी यांच्या घरी कोणता तरी वेगळाच प्राणी आला असल्याची माहिती वन्यजीव रक्षक मावळ संस्थेचे सदस्य रोहीत दाभाडे व शेखर खोमणे यांना मिळाली.

त्यांनी त्या प्राण्याचे फोटो मागवून घेतले. त्यावेळी ते खवल्या मांजर असल्याचे निष्पन्न झाले.

त्यानंतर वन्यजीव रक्षक मावळ संस्थेचे संकेत मराठे, निनाद काकडे, प्रथमेश मुंगनेकर, शेखर खोमणे,रोहीत दाभाडे,रोहन ओव्हाळ, नयन कदम, भास्कर माळी, गणेश गायकवाड, दत्ता भोसले, निलेश गराडे यांनी घटनास्थळी धाव घेतली. भटक्या श्वानाना घाबरून खवल्या मांजर घरात बसले होते.

वनपरिक्षेत्र अधिकारी हनुमंत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली खवल्या मांजराला पकडण्यात आले. त्यांनतर त्या मांजराची डॅा. दडके यांनी प्राथमिक तपासणी केली.

खवल्या मांजराला काहीही ईजा नसल्याने त्याला नैसर्गिक (Talegaon) अधिवासात सोडण्यात आले.

खवल्या मांजर अतिशय दुर्मिळ असून नऊ वर्षांपूर्वी ते देहूरोड येथेही आढळले होते.

Baramati : अजित पवार यांच्या हस्ते सुपा व माळेगाव येथील नवीन पोलीस ठाणे इमारतीचे उद्घाटन

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.