Talegaon Corona Update: मुंबईहून तळेगावला आलेली 62 वर्षीय महिला कोरोना ‘पॉझिटीव्ह’

Talegaon Corona Update: A 62-year-old woman from Mumbai, came to Talegaon, detected Corona 'positive' मावळातील सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या सहावर

एमपीसी न्यूज – तळेगाव स्टेशन येथील आनंदनगरमधील 62 वर्षीय महिलेचा कोरोना चाचणी अहवाल पाॅझिटिव्ह आला असल्याची माहिती  तळेगाव दाभाडे नगरपरिषदेचे मुख्याधिकारी दीपक झिंजाड यांनी सांगितले. त्यामुळे मावळ तालुक्यामध्ये सक्रिय रूग्णांची संख्या सहा झाली आहे.

आनंदनगरमधील 62 वर्षीय महिला ही 30 मे रोजी मुंबईहून आलेली होती. दोन तीन दिवस तब्येत बरी नसल्याने तपासणी साठी श्री समर्थ हाॅस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. त्यांचा काल स्वॅब घेण्यात आला होता. आज त्यांचा कोरोना चाचणी अहवाल पाॅझिटिव्ह आला आहे. त्यांना डाॅ भाऊसाहेब सरदेसाई तळेगाव ग्रामीण रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

 या रुग्णाच्या निकटच्या संपर्कातील तीन जणांचे तळेगाव येथील सुगी पश्चात केंद्रात संस्थात्मक विलगीकरण करण्यात आल्याचे तळेगाव प्राथमिक आरोग्य केंद्राचे डाॅ प्रवीण कानडे यांनी सांगितले.

दरम्यान, गुडविल शाळेसमोरील, रुग्णांची संपूर्ण बिल्डींग परिसर कंटेनमेंट झोन म्हणून जाहीर करण्यात आला आहे. तर, प्रभाग क्र 4 चा परिसर बफर झोन म्हणून आहे असे मावळ- मुळशीचे उपविभागीय अधिकारी संदेश शिर्के यांनी आदेशात नमूद केले आहे.

मावळ तालुक्यातील आतापर्यंत 21 रूग्णांपैकी 15 जण कोरोनामुक्त झाले आहेत. कामशेत व टाकवे बुद्रुक येथील दोन नऊ महिन्यांची बालके व कडधे 48 वर्षीय पुरूष व 70 वर्षीय महिला असे  दोन जण तर माऊ येथील 77 वर्षीय महिला व आज आनंदनगरमधील 65 वर्षीय महिलेसह  तालुक्यातील सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या सहा झाली आहे, अशी माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी चंद्रकांत लोहारे यांनी दिली.

गेल्या सात दिवसात मावळ तालुक्यात कोरोनाची साखळी तुटली होती पुन्हा सोमवार (दि 8) रोजी कडधे येथील पाॅझिटिव्ह आली होती, पुन्हा मंगळवार व बुधवार साखळी तुटली आणि आज गुरूवारी (दि.11) एकाच दिवशी दोन रूग्ण आढळले.  या परिस्थितीत रूग्ण बरे होण्याचा दर चांगला असून नागरिकांनी घाबरून जाऊ नये, काळजी घ्यावी असे तालुका आरोग्याधिकारी डाॅ चंद्रकांत लोहारे यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.