Talegaon Crime News : अल्पवयीन मुलीशी अश्लील चाळे करून फोटो सोशल मीडियावर व्हायरल; तरुणावर गुन्हा

एमपीसी न्यूज – अल्पवयीन मुलीसोबत अश्लील चाळे करून तिचा विनयभंग केला. तसेच तिचे फोटो सोशल मीडियावर अपलोड केले. याबाबत तरुणाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार 1 सप्टेंबर 2020 ते 12 फेब्रुवारी 2021 या कालावधीत मावळ तालुक्यातील बौद्धवस्ती, चांदखेड येथे घडला.

अविनाश बाळू गोटे (वय 25, रा. चांदखेड, ता. मावळ) असे गुन्हा दाखल झालेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबत पीडित मुलीच्या आईने तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी तरुणाने फिर्यादी यांच्या अल्पवयीन मुलीचे फोटो विविध सोशल मीडिया अकाउंटवर अपलोड करून बदनामी केली. त्यानंतर पीडित मुलीला गाडीत बसवून तिच्याशी अश्लील चाळे करून तिचा विनयभंग केला. अश्लील कृत्य करताना काढलेले फोटो देखील तरुणाने सोशल मीडियावर अपलोड केले. त्याच्यासोबत लग्न करण्यासाठी मुलीला जीवे मारण्याची धमकी दिली.

याबाबत तरुणाच्या विरोधात भारतीय दंड विधान कलम 354, 506, पॉक्सो कायदा कलम 8, माहिती तंत्रज्ञान अधिनियम 67 (ब) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तळेगाव दाभाडे पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.