Talegaon Crime : ‘तुला लय मस्ती आली आहे का’ असे म्हणत तरुणाच्या डोक्यात मारले दगड

एमपीसी न्यूज – ‘तुला लय मस्ती आली आहे का, बाबा ठाकूर कोण आहे तुला माहिती नाही का, बाबा आमचा भाई आहे, त्याच्याविषयी कशाला विचारतोस असे म्हणत तिघांनी एका तरुणाच्या डोक्यात दगड मारले. ही घटना शनिवारी (दि. 11) सायंकाळी पाचच्या सुमारास तळेगाव दाभाडे (Talegaon Crime) येथे घडली. 

याप्रकरणी धीरज विजय गायकवाड (वय 28, रा. सिद्धार्थनगर, तळेगाव दाभाडे) याने तळेगाव दाभाडे पाेलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार कौस्तूभ उर्फ केजी किसन जगताप (वय 20, रा. कडोलकर काॅलनी, तळेगाव दाभाडे) याला पोलिसांनी अटक केली. तर, त्याचे साथीदार धीरज अनिल गरूड आणि कुणाल मोहीत दुबे यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

फिर्यादीने धीरज याने त्याचा मित्र सुदेश याला फोन करून बाबा उर्फ कुणाल ठाकूर हा कुठे आहे, असे  विचारून  फोन ठेवून दिला. त्यानंतर सुदेश याच्या फोनवरून कुणाल दुबे याने धीरज याला फोन केला आणि तुला बाबा उर्फ कुणाल ठाकूरकडे काय काम आहे, असे विचारून फोन कट केला. त्यानंतर सायंकाळी पाचच्या सुमारास फिर्यादी धीरज उभे असलेल्या ठिकाणी आरोपी आले.

‘तुला लय मस्ती आली आहे का, बाबा ठाकूर कोण आहे तुला माहिती नाही का, बाबा आमचा भाई आहे, त्याच्याविषयी कशाला विचारतोस, असे आरोपी हे फिर्यादी धीरज याला म्हणाले. त्यावरून दहशत निर्माण करून आरोपींनी फिर्यादी धीरज याच्या डोक्यात दगड मारून जखमी केल्याचे पोलिसांनी सांगितले. तळेगाव दाभाडे पोलीस (Talegaon Crime) अधिक तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.