Talegaon Dabhade News : लग्नात मानपान न केल्याने वकील असणाऱ्या विवाहितेचा छळ, सनद घालविण्याची धमकी

एमपीसी न्यूज – लग्नात मानपान केला नाही म्हणून तसेच देण्या-घेण्यावरून सतत टोमणे मारून वकील असणाऱ्या विवाहितेचा छळ केला. तुझी सनद घालवते, बघू तू कशी बाहेर काम करते, अशी धमकीही दिली. हा प्रकार ज्ञानेश्वर नगर, तळेगाव दाभाडे (Talegaon dabhade News) येथे 10 जानेवारी 2021 ते 11 जून 2022 या कालावधीत घडला.
याप्रकरणी विवाहित महिलेले तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पती हर्षद श्यामराव जामखेडकर, सासरा श्यामराव गंगाधर जामखेडकर, सासू वैशाली श्यामराव जामखेडकर, दीर तेजस श्यामराव जामखेडकर (सर्व रा. सिल्वर विंडस सोसायटी, तळेगाव-दाभाडे) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी विवाहिता या वकील आहेत. तिचा पती हर्षद हा बँकेत नोकरीला आहे. दोघांचा विवाह 10 जानेवारी 2021 रोजी झाला आहे. मात्र, लग्नानंतर सासरच्या मंडळींनी विवाहितेला तुझ्या घरून काही आणले नाही. लग्नात आमचा मानपान केला नाही. तसेच देण्या-घेण्यावरून सतत टोमणे मारले. शिवीगाळ करून तिला मारहाण केली. विवाहिता माहेरी असताना तुझी सनद घालवू, बघू तु कशी बाहेर काम करतेस, अशी धमकी दिली, असे फिर्यादीत म्हटले आहे. महिला फौजदार प्राजक्ता धापटे (Talegaon dabhade News) अधिक तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.