Talegaon Crime : इंस्टाग्राम स्टेटसवरून घरात घुसून मारहाण करत दिली धमकी

एमपीसी न्यूज – तळेगाव दाभाडे (Talegaon Crime) येथे इनस्टाग्रामवर स्टेटस ठेवले म्हणून तरुणाच्या घरात घुसून त्याला जीवे मारण्याची धमकी देत मारहाण करण्यात आली. ही घटना शनिवारी (दि. 3) सायंकाळी टेल्को कॉलनी, तळेगाव दाभाडे येथे घडली.

विकास कनकुटे (वय 25, रा. कातवी, ता. मावळ), साहिल सोनवणे (वय 22, रा. वडगाव, ता. मावळ), निलेश सोपान कनकुटे (वय 24, रा. कातवी, ता. मावळ) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी 19 वर्षीय तरुणीने तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तरुणीच्या भावाने इंस्टाग्रामवर स्टेट्स ठेवले या कारणावरून आरोपी शनिवारी सायंकाळी साडेसात वाजताच्या सुमारास फिर्यादीच्या घरात आले. त्यांनी फिर्यादीच्या भावाला शिवीगाळ करून हाताने व बुक्क्यांनी बेदम मारहाण केली. त्यांनतर जीवे मारण्याची धमकी देऊन आरोपी निघून गेले. पोलिसांनी विकास आणि निलेश या दोन सख्ख्या भावांना अटक केली आहे. तळेगाव दाभाडे (Talegaon Crime) पोलीस तपास करीत आहेत.

Khed News : पोलिसांसमोरच दोन गटांची आपसात हाणामारी

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.