Talegaon Dabhade : किरकोळ कारणावरून तरुणाला बेदम मारहाण

एमपीसी न्यूज – किरकोळ कारणावरून (Talegaon Dabhade) दोघांनी मिळून एका तरुणाला बेदम मारहाण केली. ही घटना गुरुवारी (दि. 19) रात्री साडेआठ वाजता तळेगाव दाभाडे येथे भारत पेट्रोल पंपावर घडली.

अमन लक्ष्मीकांत गौतम (वय 18, रा. तळेगाव दाभाडे) असे मारहाण झालेल्या तरुणाचे नाव आहे. त्यांनी याप्रकरणी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, त्यानुसार फारुख अल्ताफ शेख, मन्या जाधव (रा. तळेगाव दाभाडे) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Pune : रोहित्रांच्या ठिकाणी वीज सुरक्षेसाठी फायबर प्लस्टिकचे संरक्षक कुंपण

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी अमन हे गॅरेज मध्ये काम करत नसल्याच्या कारणावरून त्यांना हाताने व (Talegaon Dabhade) लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. आरोपी फारुख याने फिर्यादी यांना दगडाने मारून जखमी केले. तसेच शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. तळेगाव दाभाडे पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.