Talegaon Dabhade: आमदार सुनील शेळके यांच्या वाढदिवसानिमित्त तळेगाव दाभाडे येथे किल्ले बनवा स्पर्धा

एमपीसी न्यूज –  आमदार सुनील शेळके यांच्या वाढदिवसानिमित्त (Talegaon Dabhade) तसेच छ. शिवाजी महाराज यांच्या 350 व्या शिवराज्याभिषेक सोहळ्या निमित्त तळेगाव दाभाडे येथे किल्ले बनवा स्पर्धा 2023 चे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेचे आयोजन शिवमुद्रा युवा मंच व आमदार सुनील आण्णा शेळके युवा मंच यांच्या वतीने करण्यात आले आहे.

ही स्पर्धा 10 ते 15 नोव्हेंबर या कालावधीत पार पडणार असून (Talegaon Dabhade) या स्पर्धेत सर्वोत्कृष्ट किल्ल्याला निष्ठावंत सरदार हिरोजी इंदुलकर पुरस्कार व रोख रक्कम 15 हजार रुपये असा सन्मान करण्यात येणार आहे. ही स्पर्धा विनामूल्य असणार आहे.

Dehuroad : क्रिकेट सामन्याच्या पार्श्वभूमीवर देहूरोड परिसरातील वाहतुकीत बदल

या स्पर्धेत मुक्त गट, महिला व मुलींचा गट तसेच 15 वर्षावरील गट असे गट असून स्पर्धकांना किल्ल्यासाठी लागणारा नकाशा गणेश निसाळ यांच्या श्री कॉम्पुटर्स (वैद्य कॉलनी) येथे मिळणार आहे. या शिवाय स्पर्धकांना 8083118171 या क्रमांकावर संपर्क सधता येणार आहे.

स्पर्धेच्या अटी –

1)      9 नोव्हेंबर 2023 सायंकाळी 7 वाजेपर्यंत प्रवेश स्वीकारले जातील

2)      किल्ला तयार केल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांविषयी घोषणावाक्य, भगवा ध्वज, मशाल, व प्रतिज्ञा असणे आवश्यक आहे.
3)      या स्पर्धेसाठी परीक्षकांचा निर्णय अंतिम राहणार आहे, गुणमापन  महाराजांविषयी माहिती बनवललेल्या किल्लेविषयी माहिती आणि वाचारलेल्या प्रश्नांवर अधारित राहील
4)      स्पर्धेत फेरबदल करण्याचा अधिकार आयोजकांकडे राहील.

तरी इच्छुक स्पर्धकांनी स्पर्धेत सहभागी व्हावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.