Talegaon Dabhade : स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी व्याख्यान संपन्न

एमपीसी न्यूज – रोटरी क्लब ऑफ तळेगाव दाभाडे व गणेश मोफत (Talegaon Dabhade)वाचनालय यांच्या संयुक्त विद्यमाने यूपीएससी, एमपीएससीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी राजमुद्रा अकादमीचे मनोहर भोळे यांचे व्याख्यान घेण्यात आले. तसेच या कार्यक्रमात रोटरी क्लब तर्फे गणेश मोफत वाचनालयातील अभ्यासिकेला 35 डेस्क खुर्च्या देणगी म्हणून देण्यात आल्या.

दिप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली.या वेळी व्यासपीठावर (Talegaon Dabhade)रोटरीचे अध्यक्ष उद्धव चितळे,सचिव श्रीशैल मेंन्थे, वाचनालयाचे अध्यक्ष यतीन शाह,खजिनदार विक्रम दाभाडे, माजी अध्यक्ष प्रशांत दिवेकर,वक्ते मनोहर भोळे,तसेच विद्यार्थी, रोटरी क्लबचे माजी अध्यक्ष विश्वनाथ मराठे,मंगेश गारोळे,विलास शाह,गुरूप्रसाद कुलकर्णी,नितीन फाकटकर,प्रसाद मुंगी आदी सदस्य उपस्थित होते.

IND vs ENG : बुमराह, शमीच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडचा डाव गडगडला, 27 षटकात 6 बाद 94

मनोहर भोळेंच्या मार्गदर्शनपर व्याख्यानानंतर त्यांनी विद्यार्थ्याबरोबर प्रश्न उत्तरांचा सेशन घेतला. त्यानंतर खुर्च्या देणगीचा कार्यक्रम संपन्न झाला,खुर्च्यासांठी योगदान दिल्या बद्दल प्रकल्प प्रमुख प्रमोद दाभाडे यांनी अध्यक्ष उद्धव चितळे,उपाध्यक्ष कमलेश कार्ले,सचिव श्रीशैल मेंन्थे,पी डी जी दिपक गंगोळी,शर्मिला शाह,डॉ नेहा कुलकर्णी,डॉ ज्योती मुंदर्गी,कीर्ती मोहरीर,संजय अडसूळ,डॉ गुरूप्रसाद कुलकर्णी,वेदांग महाजन,शैलेश जोशी,विकास उभे यांचे विशेष आभार मानले.कार्यक्रमाचे स्वागत वाचनालयाचे अध्यक्ष यतीन शाह यांनी केले तर सूत्रसंचालन प्रकल्प प्रमुख प्रमोद दाभाडे यांनी केले व वाचनालयाचे खजिनदार विक्रम दाभाडे यांनी आभार मानले,कार्यक्रमाची सांगता पसायदानाने झाली.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.