Talegaon Dabhade : ऐतिहासिक विठ्ठल मंदिरात काकड आरती महोत्सव उत्साहात

एमपीसी न्यूज – तळेगाव दाभाडे येथील शाळा चौकातील श्री विठ्ठल मंदिरात (Talegaon Dabhade )रविवारी (दि. 29) पहाटेपासून काकड आरती महोत्सवास सुरुवात झाली. या महोत्सवाला शेकडो वर्षांची परंपरा आहे. काकड आरती महोत्सवाला भाविकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदवला.
ऐतिहासिक परंपरा लाभलेल्या या  मंदिरात काकड आरतीची शेकडो वर्षाची परंपरा (Talegaon Dabhade )असुन भाविक मोठ्या संख्येने या कार्यक्रमास भक्तिभावाने  उपस्थिती दाखवत असतात.

पहाटे पांडुरंगास अभिषेक,पूजा,  काकड आरती,भजन आदी धार्मिक कार्यक्रम नित्यनेमाने होत असतात.   काकड आरती महोत्सवाचा शुभारंभ  पुणे जिल्हा फुल उत्पादक संघाचे  अध्यक्ष व उद्योजक शिवाजीराव उत्तम  भेगडे व त्यांच्या पत्नी अरुणाताई भेगडे यांचे हस्ते करण्यात आला.
या सर्व कार्यक्रमाचे आयोजन  ह.भ.प.ज्ञानेश्वर महाराज दाभाडे (माऊली),यतिनभाई शहा, किरण गवारे,अतुल देशपांडे आणी उत्सव समितीचे अध्यक्ष अनिल फाकटकर यांनी केले होते.

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.