Talegaon Dabhade : जागतिक पृथ्वी दिनानिमित्त ई – कचरा संकलन मोहीम

एमपीसी न्यूज – जागतिक पृथ्वी दिनाचे औचित्य साधून तळेगाव दाभाडे नगरपरिषद, रोटरी क्लब ऑफ तळेगाव दाभाडे सिटी व ग्रीन स्केप इको मॅनजमेंट प्रायव्हेट लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने ई – कचरा संकलन मोहीम राबविण्यात येणार आहे. (Talegaon Dabhade) रविवारी (दि. 30) नगरपरिषदे कडून ई – कचरा संकलित केला जाणार आहे. नागरिकांनी आपल्या घरातील ई कचरा देऊन मोहिमेत सहभाग नोंदवावा, असे आवाहन मुख्याधिकारी एन के पाटील व उपमुख्याधिकारी सुप्रिया शिंदे यांनी केले.

या उपक्रमासाठी उपमुख्याधिकारी सुप्रिया शिंदे,स्वच्छता निरीक्षक प्रमोद फुले,मयूर मिसाळ,तुकाराम मोरमारे, शहर समन्वयक गितांजली होनमने तसेच रोटरी क्लब ऑफ तळेगाव दाभाडे (Talegaon Dabhade) सिटीचे अध्यक्ष दीपक फल्ले, उपाध्यक्ष शाहीन शेख, सेक्रेटरी सुरेश शेंडे, प्रकल्प प्रमुख प्रशांत ताये, सहप्रकल्प प्रमुख प्रसाद बांदगुडे, सदस्य रेश्मा फडतरे यांचा विशेष सहभाग लाभणार आहे.

तळेगाव दाभाडे नगर परिषदेकडून ई-कचरा संकलन करण्यात येणार असून यामध्ये नागरिकांकडील बंद इस्त्री,फॅन, टीव्ही,मोबाईल चार्जर,जुने टेपरेकॉर्डर,सिडी,बंद इलेक्ट्रॉनिक्स उपकरणे,इलेक्ट्रिक खेळणी आदी संकलन करणाऱ्या वाहनामध्ये संकलित करून नागरिकांनी या उपक्रमास हातभार लावावा. असे आवाहन मुख्याधिकारी एन. के. पाटील यांनी पत्रकाव्दारे केले.

दरवर्षी प्रमाणे 22 एप्रिल हा दिवस जागतिक“अर्थ दिवस”(Earth Day)  म्हणून साजरा करण्यात येतो. यासअनुसरून तळेगाव दाभाडे नगरपरिषद, रोटरी क्लब ऑफ तळेगाव दाभाडे (Talegaon Dabhade) सिटी व ग्रीनस्केप मॅनेजमेंट प्रा.लि. यांच्या संयुक्त विद्यमानाने नगरपरिषद हद्दीत वास्तव्य करीत असलेल्या नागरिकांकडून दि. 30 एप्रिल रोजी घरोघरी जाऊन ई-कचरा संकलन करण्यात येणार आहे.

Pune : पुण्यात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता

यासाठी नगरपरिषदेमार्फत नागरिकांच्या सोयीसाठी यशवंतनगर चौक,स्वप्ननगरी,नगरपरिषद कार्यालयचावडीचौक,भंडारी हॉस्पिटल, शेळके उद्यान,जिजामाता चौक व बेटी बचाओ- बेटी पढाओ याठिकाणी दि. 27 पासून ई-कचरा संकलन करण्यात येणार आहे.

यावेळी दैनंदिन निर्माण होणारा घरगुती कचरा ओला, सुका व घातक अश्या वेगवेगळ्या स्वरुपात घंटागाडीतच द्यावा असे आवाहन नगरपरिषदेचे मुख्याधिकारी एन. के. पाटील यांनी केले आहे.

1) या उपक्रमात “ज्या गृहरचना संस्थेमार्फत जास्तीत जास्त ई-कचरा नगरपरिषदेस सुपूर्द करण्यात येईल त्या गृहरचना संस्थेस नगरपरिषद व रोटरी क्लब ऑफ तळेगाव दाभाडे सिटी यांच्यातर्फे सन्मानित करण्यात येईल.”

2) शासनामार्फत 120 मायक्रॉन पेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्यांवर बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे शहर स्वच्छतेसाठी नागरिकांनी व व्यापाऱ्यांनी प्लास्टिक पिशव्यांचा वापर बंद करून पर्यायी पिशव्यांचा वापर करण्यावर भर द्यावा.

3) तसेच विना परवानगी सार्वजनिक ठिकाणी बॅनर लावून शहराचे विद्रुपीकरण करू नये किंवा बॅनर लावायचे असल्यास नगरपरिषदेने निश्चित केलेल्या ठिकाणी अल्प काळासाठी परवानगी घेऊन बॅनर लावावे.

 

.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.