Talegaon Dabhade : विविध धार्मिक कार्यक्रमाने आषाढी एकादशी साजरी

एमपीसी न्यूज- आषाढी एकादशी निमित्त तळेगाव शहरातील विविध भागातील श्री विठ्ठल मंदिरामध्ये विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती.

शाळा चौकातील ऐतिहासिक श्री विठठल मंदिरात तळेगाव दाभाडे नगर परिषदेच्या नगराध्यक्षा चित्रा जगनाडे व पती संदीप यांचे हस्ते पहाटे महापूजा, अभिषेक करण्यात आला. विठ्ठल मंदिर संस्थांचे अध्यक्ष तसेच राज्यमंत्री बाळा भेगडे यांचे हस्ते त्यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी माजी नगराध्यक्ष सुरेश शहा, बाळासाहेब जांभूळकर, हभप ज्ञानेश्वर महाराज दाभाडे आदी मान्यवर व भाविक मोठ्या संसंख्येने उपस्थित होते.

माळी आळी, नीलकंठ नगर, जोशीवाडी येथील श्री विठ्ठल मंदिरात पहाटे काकड आरती, महापूजा, भजन,कीर्तन आदि धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. शाळा चौकातील मंदिरात तळेगाव शहर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष गणेश काकडे यांचे वतीने सकाळ पासून भाविकांना प्रसादाचे वाटप करण्यात आले. मंदिरासमोर आकर्षक रांगोळी, फुलांची सजावट, विजेची रोषणाई, तसेच दिवसभर विविध मंडळांची भजन सेवा याशिवाय रात्री हभप शेखरबुवा व्यास यांचे कीर्तन आदि कार्यक्रम साजरे करण्यात आले. मंदिरात विधीवत पूजा ग्राम पुरोहित अतुल रेडे व आप्पा शिरुरे यांनी केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.