Talegaon Encroachment: तळेगाव येथील शिवाजी चौकातील अतिक्रमणावर कारवाईची मागणी

एमपीसी न्यूज : तळेगाव दाभाडे येथील छत्रपती शिवाजी चौकात खाऊ गल्लीच्या नावाखाली अतिक्रमण वाढत असून (Talegaon Encroachment) त्यावर त्वरीत कारवाई करण्यात यावी अशी मागणी माहिती अधिकार कार्यकर्ते प्रदिप नाईक यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.

नाईक यांनी निवेदनाद्वारे ही मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. या निवेदनात म्हटले आहे की, वास्तविक आंबी येथील पूल मागील वर्षभरापासून बंद केला आहे. त्यामुळे तेथील वाहतूक ही शिवाजी चौकातून होते. त्यात चौकात अनेक गाड्यावाल्यांनी खाऊ गल्लीच्या नावाखाली रस्त्यावर अतिक्रमण केले आहे.

Spartan Monsoon League : रायझिंग स्टार्स क्लबचा विजयाचा चौकार; पुणे रेंजर्स क्रिकेट क्लब, ब्राईट इलेव्हन क्लब संघांची विजयी कामगिरी

त्यामुळे चौकात वाहतूक कोंडी होत आहे. मागील तीन वर्षात तळेगाव दाभाडे नगरपालिकेचे मुख्यअधिकारी वैभव आवारे यांनी शहराला अतिक्रमणाच्या विळख्यातून बाहेर काढले होते. (Talegaon Encroachment) मात्र पुन्हा अतिक्रमण वाढल्याने चौकात वाहतूक कोंडी वाढली असून अपघात होण्याची शक्यता आहे.सध्याचे मुख्याधिकारी यांचे शहराकडे दुर्लक्ष होत आहे. तरी जिल्हाधिकाऱ्यांनी यावर ठोस पोवले उचलावीत अशी मागणी नाईक यांनी केली आहे.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.