गुरूवार, ऑक्टोबर 6, 2022

Spartan Monsoon League : रायझिंग स्टार्स क्लबचा विजयाचा चौकार; पुणे रेंजर्स क्रिकेट क्लब, ब्राईट इलेव्हन क्लब संघांची विजयी कामगिरी

एमपीसी न्यूज – स्पार्टन क्रिकेट क्लबतर्फे आयोजित दुसर्‍या ‘स्पार्टन मान्सुन लीग’ अजिंक्यपद टी – 20 क्रिकेट स्पर्धेत रायझिंग स्टार्स क्लबने सलग चौथा तर, पुणे रेंजर्स क्रिकेट क्लबने दुसरा आणि ब्राईट इलेव्हन क्लबने संघाने आपल्या प्रतिस्पर्धी संघाचा पराभव करून पहिला विजय मिळवत गुणांचे खाते उघडले.

सिंहगड रोडवरील कोद्रे फार्मस् क्रिकेट मैदानावर सुरू असलेल्या या स्पर्धेत निलेश माळी याच्या अर्धशतकी खेळीमुळे ब्राईट इलेव्हन क्लबने ब्रेव्हहार्ट क्रिकेट क्लबचा 20 धावांनी पराभव केला. कौशिक देशपांडे (नाबाद 68 धावा) आणि निलेश माळी (58 धावा) यांच्या फलंदाजीमुळे ब्राईट इलेव्हन क्लबने 20 षटकात 178 धावांचे आव्हान उभे केले होते. त्याला उत्तर देताना ब्रेव्हहार्ट क्रिकेट क्लबचा डाव 158 धावांवर आटोपला.

कपिल कुर्लेकर याच्या गोलंदाजीमुळे पुणे रेंजर्स क्रिकेट क्लबने रायझिंग बॉईज क्लबचा 2 गडी राखून सहज पराभव केला.रायझिंग बॉईज क्लबने 112 धावा धावफलकावर लावल्या. पुणे रेंजर्सच्या कपिल कुर्लेकर याने 26 धावात 3 गडी बाद करून अचूक गोलंदाजी केली. हे आव्हान पुणे रेंजर्स क्रिकेट क्लबने 14.2 षटकात व 8 गडी गमावून पूर्ण केले.रणवीर मंको (26 धावा), श्रीकांत फणसे (22 धावा) आणि प्रसाद कुंटे (16 धावा) यांनी संघाचा विजय सोपा केला.

विक्रम माळी याच्या 84 धावांच्या स्फोटक गोलंदाजीच्या जोरावर रायझिंग स्टार्स क्लबने ऑरेंज आर्मी क्लबचा 16 धावांनी पराभव केला.विक्रम माळीच्या 46 चेंडूतील 8 चौकार आणि 4 षटकारांसह 84 धावांमुळे रायझिंग स्टार्स क्लबने 209 धावांचा डोंगर उभा केला.या आव्हानाला उत्तर देताना ऑरेंज आर्मी क्लबला 193 धावाच करता आल्या.

सामन्याचा संक्षिप्त निकाल : गटसाखळी फेरीः

ब्राईट इलेव्हन क्लब : 20 षटकात 7 गडी बाद 178 धावा (कौशिक देशपांडे नाबाद 68 (47, 5 चौकार,4 षटकार), निलेश माळी 58 (32, 7 चौकार), आदिनाथ कौसाळकर 2-26) वि.वि. ब्रेव्हहार्ट क्रिकेट क्लबः 20 षटकात 7 गडी बाद 158 धावा (नेल्सन एरीक 40, वैभव लवांडे 34, आयुश श्रीवास्तव नाबाद 23, अभिषेक गुलूमकर 2 – 43); सामनावीरः निलेश माळी;

रायझिंग बॉईज क्लब : 18 षटकात 10 गडी बाद 112 धावा (सुरज झा 26, लखन परासे 24, कपिल कुर्लेकर 3 – 26, देव चौधरी 3 – 27, निखील नासेरी 2 – 18) पराभूत वि. पुणे रेंजर्स क्रिकेट क्लबः 14.2 षटकात 8 गडी बाद 113 धावा (रणवीर मंको 26, श्रीकांत फणसे 22, प्रसाद कुंटे 16, हरीश पटेल 2 – 38, सनी वाघळे 2 – 4); सामनावीरः कपिल कुर्लेकर;

रायझिंग स्टार्स क्लब : 18 षटकात 7 गडी बाद 209 धावा (विक्रम माळी 84 (46, 8 चौकार, 4 षटकार), अभिषेक कौशिक 42, निखील जैन 37, हेमंत पाटील 29, अमित गणपुळे 2-36) वि.वि. ऑरेंज आर्मी क्लब : 18 षटकात 8 गडी बाद 193 धावा (रूद्रांग सी. 65 (47,5 चौकार, 4 षटकार), अमित गणपुळे 29, फर्श अन्सारी 3 – 41, निखील जैन 2 – 39); सामनावीरः विक्रम माळी.

spot_img
Latest news
Related news