Pune News: नागरिकाला मारहाण, शिवीगाळ करणा-या पोलीस निरीक्षकाला निलंबित करा – श्रीजीत रमेशन

एमपीसी न्यूज : पुणे पोलिसांच्या सामाजिक सुरक्षा कक्षाशी संलग्न असलेले पोलीस निरीक्षक राजेश पुराणिक यांनी  एका व्यक्तीला मारहाण आणि शिवीगाळ केल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.(Pune News) पुराणिक काही नागरिकांना मारहाण करत असल्याचे व्हिडीओत दिसत आहे. त्यामुळे त्यांना तातडीने निलंबित करण्याची मागणी राष्ट्रीय माहिती अधिकारी श्रीजीत रमेशन यांनी केली आहे.

 

याबाबत पोलीस महासंचालक, पुणे पोलीस आयुक्तांना निवेदन पाठविले आहे. त्यात रमेशन यांनी म्हटले आहे की, राजेश पुराणिक हे आपल्या पदाचा गैरवापर करत आहेत. व्हायरल झालेल्या व्हिडीओत ते एका व्यक्तीला मारहाण आणि शिवीगाळ करत आहेत.

Sports News : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त ‘मिनी मॅरेथॉन’ शर्यतीचे आयोजन

हे  गंभीर कृत्य आहे. नागरिकाच्या मानवी हक्कांचे उल्लंघन आहे. तसेच सेवा नियमांचे गैरवर्तन आहे. त्यामुळे या प्रकरणाकडे गांभीर्याने लक्ष घालून योग्य तपास करावा.(Pune News) दोषी पोलीस अधिकाऱ्यावर लवकरात लवकर कठोर कारवाई करावी. त्यांना तत्काळ निलंबित करण्यात यावे. दोषी आढळल्यास त्याच्यांविरुद्ध एफआयआर दाखल करण्याची मागणी रमेशन यांनी केली.

दरम्यान, सामाजिक सुरक्षा विभागाचे पोलीस अधिकारी राजेश पुराणिक सध्या शहरातील अवैध धंद्यांवर कारवाई करताना दिसतात. मागील काही दिवसांपासून शहरात चालू असणाऱ्या अवैध धंद्यांवर त्यांनी सातत्याने कारवाया केल्या आहेत. याच कारवायादरम्यानचा हा व्हिडिओ असल्याचं आता सांगितले जात आहे.(Pune News) एका जुगार अड्ड्यावर छापा टाकल्यानंतर पुराणिक यांनी त्या ठिकाणी सापडलेल्या व्यक्तींना मारहाण केली असल्याचा दावा केला जातो.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.