Talegaon Dabhade : प्रत्येकाने स्त्री जन्माचे मनापासून स्वागत करावे – डॉ. लता पुणे

एमपीसी न्यूज – समाजातील प्रत्येकाने स्री जन्माचे मनापासून (Talegaon Dabhade) स्वागत करावे. तरच समाजात स्री पुरूष समानता येईल, असे प्रतिपादन डाॅ. लता पुणे यांनी केले. तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या वतीने जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने आयोजित केलेल्या कार्यक्रमात डाॅ. पुणे बोलत होत्या. यावेळी व्यासपीठावर पत्रकार रेश्मा फडतरे, मुख्याधिकारी विजयकुमार सरनाईक हे होते.

यावेळी बोलताना डॉ. पुणे म्हणाल्या की, निसर्गाचा समतोल राखत प्रत्येकाने आपले आरोग्य सांभाळले पाहिजे. पत्रकार रेश्मा फडतरे म्हणाल्या की, महिलांनीच महिलाचा आदर, सन्मान करायला हवा. तर महिलांवर होत असलेल्या अन्यायाविरुद्ध आवाज उठविण्यासाठी महिलांनी ठामपणे उभे राहिले पाहिजे. महिलांमध्ये स्वच्छतेचा उपजत गुण असुन त्यांनी समाजाच्या जडणघडणीमध्ये सक्रिय सहभाग घ्यायला हवा, असे मुख्याधिकारी सरनाईक म्हणाले.

यावेळी नगरपरिषदेच्या वतीने माझी वसुंधरा अभियानाअंतर्गत पथनाट्य सादर केलेल्या तेजस्विनी बचत गटातील महिलांचा सत्कार करण्यात आला. याशिवाय स्वच्छ वार्ड, स्वच्छ मार्केट, स्वच्छ ऑफीस, स्वच्छ हॉस्पिल, स्वच्छ हॉटेल आदी घटकांचा यावेळी विशेष सत्कार करण्यात आला.

PMRDA News : सदनिकांचा ताबा 25 एप्रिलला देणार; पीएमआरडीएचे दिव्यांगांना आश्वासन

या (Talegaon Dabhade) कार्यक्रमाचे सुत्रसंचालन महिला बचत विभागाच्या सुवर्णा काळे व विभा वाणी यांनी केले. यावेळी नगरपरिषदेमध्ये काम करत असलेल्या सर्व महिला कर्मचारी, अधिकारी उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.