Talegaon Dabhade : मोफत नेत्ररोग तपासणी, शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

एमपीसी न्यूज – रोटरी क्लब ऑफ तळेगाव दाभाडे सिटी (Talegaon Dabhade) व उडान फाउंडेशन (पुणे) यांच्या वतीने नेत्ररोग तपासणी व मोफत शस्त्रक्रिया शिबिर आयोजित करण्यात आले आहे. रविवारी (दि. २७) सकाळी दहा ते दुपारी दोन या कालावधीत प्राथमिक आरोग्य केंद्र, तळेगाव दाभाडे येथे हे शिबिर होणार आहे. अशी माहिती रोटरी क्लब ऑफ तळेगाव दाभाडे सिटीचे अध्यक्ष दीपक फल्ले व प्रकल्प प्रमुख किरण ओसवाल यांनी दिली.

हे शिबीर प्राथमिक आरोग्य केंद्र, तळेगाव दाभाडे येथे रविवार दि. 27 नोव्हेंबर रोजी सकाळी 10 ते दुपारी 2 वाजेपर्यंत होणार आहे. या नियोजित शिबिराचे उद्घाटन माजी राज्यमंत्री संजय उर्फ बाळा भेगडे यांच्या शुभहस्ते तर कार्यक्रमाचे अध्यक्षपदी प्राथमिक आरोग्य केंद्राचे अध्यक्ष नितीन मराठे भूषविणार आहेत. यावेळी मेडिकल एज्युकेशन महाराष्ट्राचे सहसंचालक डॉ. अजय चंदनवाले व डॉ. राजेश मेहता यांची उपस्थिती लाभणार आहे.

Ncp : पिंपरी-चिंचवडकरांना दिवसाआड पाणी हे भाजपचेच पाप – अजित गव्हाणे

तरी तळेगाव शहर व परिसरातील नागरिकांनी (Talegaon Dabhade) या मोफत नेत्ररोग तपासणी व मोफत शस्त्रक्रिया शिबिराचा मोठ्या संख्येने लाभ घ्यावा, असे आवाहन अध्यक्ष दीपक फल्ले व प्रकल्प प्रमुख किरण ओसवाल यांनी केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.