Talegaon Dabhade : रोटरीतर्फे नगर परिषद शाळेला ग्रंथालयासाठी कपाट व पुस्तके भेट  

एमपीसी न्यूज – तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या थोर समाजसेवक नथुभाऊ भेगडे पाटील शाळेला रोटरी क्लब ऑफ तळेगाव दाभाडे तर्फे कपाटे व पुस्तके उपलब्ध करून देण्यात (Talegaon Dabhade)आली. साहित्य प्रदान करण्याचा कार्यक्रम शाळेत नुकताच संपन्न झाला. विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त वाचन करावे, असे आवाहन यावेळी उपस्थितांनी केले.

तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या थोर समाजसेवक नथुभाऊ भेगडे शाळेला रोटरी क्लब ऑफ तळेगाव दाभाडे तर्फे कपाटे व पुस्तके उपलब्ध करून देण्यात आली. या प्रकल्पासाठी रो  मिरा जोशी-साने,रो डॉ नेहा कुलकर्णी, रो विलास शहा,रो दीपक गांगोली,रो डॉ ज्योती मुंडर्गी यांनी विशेष सहकार्य केले.

Maharashtra : शिक्षण विभागातर्फे नविन बदलानुसार आरटीई प्रवेशाच्या मार्गदर्शक सूचना जाहीर

छोटे खानी झालेल्या या कार्यक्रमाला अध्यक्ष उद्धव चितळे,उपाध्यक्ष कमलेश कार्ले,सचिव श्रीशैल मेन्थे, खजिनदार प्रमोद दाभाडे,डॉ नेहा कुलकर्णी,विलास शहा,डॉ ज्योती मुंडर्गी,तुषार अल्हाट,धनंजय मथुरे, नागराज मुंडर्गी व सदस्य उपस्थित होते.

अध्यक्ष उद्धव चितळे व डॉ नेहा कुलकर्णी यांनी भविष्यात देखील शाळेला लागेल तेथे खरी गरज ओळखून रोटरी कायम उभी असेल अशी ग्वाही दिली,तसेच विद्यार्थ्यांनी उपलब्ध पुस्तके जरूर वाचावी असे सांगितले

थोरात मॅडम व शिक्षक वर्गाचे विशेष सहकार्य लाभले शाळेतर्फे आभार थोरात मॅडम यांनी (Talegaon Dabhade)  मानले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.