Talegaon Dabhade : सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त मुलींची हिमोग्लोबिन तपासणी

एमपीसी न्युज – ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त मेधावीण फाउंडेशन, इनरव्हील क्लब ऑफ तळेगाव दाभाडे व प्राथमिक आरोग्य केंद्र यांच्या संयुक्त विद्यमानाने बालिका दिन साजरा करण्यात आला. यानिमित्त नगरपरिषद शाळेतील (Talegaon Dabhade)मुलींची हिमोग्लोबिन तपासणी करण्यात आली.

यावेळी  स्त्री रोग तज्ञ रेणुका पारवे यांनी विद्यार्थिनींच्या आरोग्याच्या समस्या जाणून त्यावर मार्गदर्शन केले. तसेच हिमोग्लोबीन तपासणी करून त्या संदर्भात माहिती दिली. वैशाली दाभाडे यांनी डॉ रेणुका पारवे यांच्या हातात ज्योत देऊन पुन्हा एकदा  ज्ञानाची ज्योत पेटवून  विद्यार्थीनी शिक्षणाची मोठी स्वप्न पहा व डॉक्टर रेणुका पारवे यांच्यासारखी  नवी युवती पिढी (Talegaon Dabhade)घडावी अशी भावना व्यक्त केली.

Pune : येत्या 6 जानेवारी ते 8 जानेवारी रोजी पिंपरीत रंगणार 18 वे जागतिक मराठी संमेलन

प्राथमिक आरोग्य केंद्राच्या जयश्री लोहकरे,गौरी तळपे व आकाश म्हस्के यांनी हिमोग्लोबिन चेकअप केले.या वेळी फाऊंडेशनच्या उपाध्यक्षा मंगल भेगडे,सचिव स्वाती दाभाडे, माया भेगडे,वैशाली जामखेडकर, जयश्री दाभाडे,साधना काळोखे,ममता मराठे,साधना भेगडे,ज्योती पाटील, वैशाली चव्हाण व सदस्य तसेच शाळा क्र.5 (Talegaon Dabhade) मुख्याध्यापिका शोभा कांबळे,सहशिक्षिका वैशाली मिरघे, शाळा क्र 2 च्या योगिता शिंदे,शीतल रासकर,सुधीर बसवंते,सुप्रिया वाव्हळ उपस्थित होत्या.

यावेळी डॉ.दीपक ढवळे यांचे विशेष सहकार्य लाभले. प्रास्ताविक अध्यक्षा वैशाली दाभाडे यांनी केले. सूत्रसंचालन तावरे मॅडम यांनी तर आभार सचिव स्वाती दाभाडे यांनी मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.