Pune News : बंडगार्डन येथे 16.32 लाख रुपये किंमतीचा 1 किलो 88 ग्राम चरस जप्त; दोघांना अटक

एमपीसी न्यूज : बंडगार्डन ताडीवाला रोड येथे परराज्यातील दोन इसमांनी विक्रीसाठी आणलेल्या 16.32 लाख रुपये किंमतीचा एक किलो 88 ग्राम चरस जप्त करण्यात (Pune News) आला आहे. ही कामगिरी अमली पदार्थ विरोधी पथक – 2, गुन्हे शाखा, पुणे शहर यांनी केली आहे.

याप्रकरणी अमीर खान (वय 24 वर्ष, रा. ताडीवाला रोड, पुणे; मुळगाव – दावा, जि. कासगंज, उत्तर प्रदेश) आणि अतुल वानखेडे (वय 22 वर्षे, रा. ताडीवाला रोड, मुळगाव तथागत नगर, बुलढाणा) या दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे.

त्यांच्या ताब्यातून एकूण 16.32 लाख रुपये किंमतीचा एक किलो 88 ग्राम चरस हा अमली पदार्थ, 1.5 लाख रुपये किंमतीची एक ड्यूक कंपनीची केटीएम मोटरसायकल व वीस हजार रुपये किंमतीचे दोन मोबाईल संच असा एकूण 18.02 लाख रुपये किंमतीचा अंमली पदार्थ व इतर ऐवज जप्त करण्यात आला आहे.

Talegaon Dabhade : सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त मुलींची हिमोग्लोबिन तपासणी

पोलीस निरीक्षक सुनील थोपटे, पोलीस उपनिरीक्षक दिगंबर चव्हाण बंडगार्डन पोलीस ठाण्याच्या हद्दीत 2 जानेवारी रोजी पेट्रोलिंग करत होते. त्यावेळेस पोलिसांना युवराज कांबळे (Pune News) यांना मिळालेल्या माहितीनुसार सापळा रचून आरोपीना अटक करण्यात आली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.