Talegaon Dabhade : राज्यस्तरीय वेटलिफ्टिंग स्पर्धेत इंद्रायणीच्या विद्यार्थिनींचे यश

एमपीसी न्यूज – सिंधुदुर्ग येथे पार पडलेल्या राज्यस्तरीय वेटलिफ्टिंग स्पर्धेत तळेगाव दाभाडे येथील इंद्रायणी महाविद्यालयाच्या दोन विद्यार्थिनींनी यश मिळवले.(Talegaon Dabhade) 19 वर्षीय, 63 किलो वजनी गटात साक्षी म्हाळसकर हिने दुसरा तर 17 वर्षीय, 55 किलो वजनी गटात हर्षिता पठारे हिने तृतीय क्रमांक मिळवला आहे. दोघींनी अनुक्रमे 106 आणि 116 किलो वजन उचलत विजयला गवसणी घातली. याबद्दल संस्थेने अभिनंदन केले.

क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय सिंधुदुर्ग यांच्या द्वारा आयोजित राज्यस्तर वेटलिफ्टिंग स्पर्धेमध्ये 19 वर्ष मुलींच्या गटामध्ये साक्षी म्हाळसकर हिने 63 किलो वजनी गटात क्लीन अँड जर्क- 58 किलो, जर्क 48 किलो असे एकूण 106 किलो वजन उचलून सिल्वर मेडल मिळवले.

तर 17 वर्ष मुलींच्या गटात हर्षिता पठारे हिने 55 किलो वजनी गटात क्लीन अँड जर्क- 64 किलो,स्नॅच -52 किलो असे एकूण 116 किलो वजन उचलून तृतीय क्रमांक मिळवला.

Alandi News : श्री ज्ञानेश्वर विद्यालयाचे तालुकास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धेत घवघवीत यश

इंद्रायणी विद्या मंदीर संस्थेचे अध्यक्ष रामदास आप्पा काकडे, इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेचे कार्यवाह चंद्रकांत शेटे, सर्व संस्थेचे पदाधिकारी, (Talegaon Dabhade) इंद्रायणी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.संभाजी मलघे, उपप्राचार्य अशोक जाधव, शारीरिक शिक्षण संचालिका प्रतिभा गाडेकर,बिहारीलाल दुबे, नितीन म्हाळसकर यांनी खेळाडूंचे अभिनंदन व कौतुक केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.