Talegaon Dabhade : नाविन्यपूर्ण संशोधनामुळेच देश घडणार – प्राचार्य डॉ. संभाजी मलघे 

महाविद्यालयीन स्तरावरील आविष्कार संशोधन स्पर्धा इंद्रायणी महाविद्यालयात संपन्न

एमपीसी न्यूज – समाज प्रगतीपथावर जायचा असेल तर समाजकारण, राजकारण,विकास याबरोबरच (Talegaon Dabhade) संशोधनाची नितांत आवश्यकता आहे. नाविन्यपूर्ण संशोधनामुळेच देश घडणार आहे,असे मत इंद्रायणी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संभाजी मलघे यांनी व्यक्त केले. सावत्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने आयोजित केलेल्या महाविद्यालयीन स्तरावरील आविष्कार स्पर्धा इंद्रायणी महाविद्यालयात संपन्न झाल्या. कला, वाणिज्य,बीबीए,बीसीए,एमए,एम कॉम या विद्याशाखेतील विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदवला. संशोधन क्षेत्रात नाविन्यपूर्ण पोस्टर्स सादर करून समाजासाठी या संशोधनाचा असलेला फायदा सांगितला.यावेळी प्राचार्य मलघे बोलत होते.

केले.याप्रसंगी डाॅ सत्यम सानप,डॉ. एस एस मेंगाळ,प्रा.दीप्ती पेठे प्रा.आर आर भोसले, प्रा.विद्या भेगडे, प्रा. रोहित नागलगाव,डाॅ संदीप कांबळे, प्रा सत्यजित खांडगे,डाॅ.अर्चना जाधव,प्रा छाया काशीद, गोरखनाथ काकडे तसेच विविध विभागाचे विभाग प्रमुख, प्राध्यापक आणि महाविद्यालयातील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

स्पर्धेचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मलघे यांच्या शुभहस्ते झाले. याप्रसंगी बोलताना(Talegaon Dabhade) प्राचार्य म्हणाले की समाज प्रगतीपथावर जायचा असेल तर समाजकारण, राजकारण,विकास याबरोबरच संशोधनाची नितांत आवश्यकता आहे. मूलभूत आणि जीवन उपयोगी संशोधन झाल्याशिवाय समाज प्रगतीपथावर जाणार नाही.आज कला,वाणिज्य,विज्ञान,तंत्रशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांजवळ नाविन्यपूर्ण संशोधन सिद्ध करण्याची क्षमता आहे.

Pune : वीज पुरवठा खंडित केल्याच्या रागातून दोघांनी महीला अधिकाऱ्यांना ठेवलं डांबून

प्रत्येक विद्यार्थ्यांमध्ये संशोधक दडलेला असतो फक्त तो ओळखून त्याला पूरक वातावरण निर्माण करण्याची जबाबदारी शैक्षणिक संस्थांची असते.इंद्रायणी महाविद्यालयाने विद्यार्थ्यांसाठी असे पोषक वातावरण कायमच निर्माण केले आहे.इंद्रायणी महाविद्यालयातील विद्यार्थी आपल्या नाविन्यपूर्ण संशोधनामधून आपला ठसा उमटवतील.यासाठी आविष्कार सारख्या संशोधन स्पर्धा महत्त्वाच्या असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच विद्यार्थ्यांना पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

या स्पर्धेत महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने आपला सहभाग नोंदवून उत्तमोत्तम (Talegaon Dabhade) संशोधन प्रकल्प सादर केले. विविध विभागाचे विभाग प्रमुख यांनी विद्यार्थ्यांच्या प्रकल्पाचे परीक्षण करीत त्यांच्या कल्पकतेचे व संशोधन वृत्तीचे कौतुक केले.

या महाविद्यालयीन स्तरावरील स्पर्धेचे नियोजन संशोधन समन्वयक डॉ. सत्यम सानप यांनी केले.हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी इतर प्राध्यापक, शिक्षकेत्तर वर्ग यांनी मोलाचे सहकार्य केले.
इतर विद्यार्थ्यांनी स्पर्धकांना प्रोत्साहन दिले. संस्थेचे अध्यक्ष रामदास काकडे व कार्यवाह चंद्रकांत शेटे यांनी संशोधक विद्यार्थ्यांनी आपल्या संशोधनाचे पेटंट घ्यावे यासाठी संस्था आर्थिक मदत करेल असे सांगून संशोधक विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.

या महाविद्यालयीन स्तरावरील स्पर्धेचे नियोजन संशोधन समन्वयक डॉ. सत्यम सानप यांनी केले.हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी इतर प्राध्यापक, शिक्षकेत्तर वर्ग यांनी मोलाचे सहकार्य केले.इतर विद्यार्थ्यांनी स्पर्धकांना प्रोत्साहन दिले. संस्थेचे अध्यक्ष रामदास काकडे व कार्यवाह चंद्रकांत शेटे यांनी संशोधक विद्यार्थ्यांनी आपल्या संशोधनाचे पेटंट घ्यावे यासाठी संस्था आर्थिक मदत करेल असे सांगून संशोधक (Talegaon Dabhade) विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.