Talegaon Dabhade : लक्ष्मीबाई घोजगे यांचे निधन

एमपीसी न्यूज – जांबवडे (ता.मावळ) येथील शेतकरी कुटुंब आणि वारकरी संप्रदायातील मार्गदर्शक लक्ष्मीबाई बबनराव घोजगे यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्या ८७ वर्षांच्या होत्या.

त्यांच्या मागे दोन मुले, चार मुली, पुतणे, सुना, नातवंडे, पतवंडे असा मोठा परिवार आहे. त्यांचा धार्मिक कार्यांत नेहमी सहभाग असायचा.

प्रगतिशील शेतकरी लक्ष्मण घोजगे, सुदुंबरे विविध कार्यकारी सोसायटीचे संचालक भरत घोजगे यांच्या त्या मातोश्री तर, उपसरपंच अंकुश घोजगे आणि खेड तालुका भाजपचे उपाध्यक्ष सुनील देवकर यांच्या त्या आजी होत.

पत्रकार विलास भेगडे यांच्या त्या मावशी तर, सुदुंबरेचे माजी सरपंच माणिक गाडे यांच्या त्या आत्या होत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.