Talegaon Dabhade : तळेगाव दाभाडे नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष निवृत्ती बाळोबा भेगडे यांचे निधन

एमपीसी न्यूज- भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि तळेगाव दाभाडे नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष निवृत्ती बाळोबा भेगडे (वय८५) यांचे मंगळवारी (दि.२६) रात्री अकराच्या सुमारास हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुलगे,एक विवाहित मुलगी, एक भाऊ, पुतणे, नातवंडे,पतवंडे असा मोठा परिवार आहे.

1985 साली वार्ड क्रमांक 4 मधून भारतीय जनता पक्षाच्या तिकिटावर ते निवडूनआले होते. 1991 साली नगराध्यक्षपदाची त्यांनी यशस्वी
धुरा सांभाळली होती. या काळात त्यांनी तळेगावचा पाणी प्रश्न मार्गी लावला. 1962 साली खडकी येथील दारुगोळा फॅक्टरीमध्ये त्यांनी कामगार म्हणून काम केले. तेथे त्यांनी कामगार प्रतिनिधी म्हणून काम करताना कामगारांना न्याय मिळवून दिला.

20 वर्षानंतर त्यांनी स्वेच्छा निवृत्ती घेतल्यानंतर ते सक्रिय राजकारणात उतरले. मावळ तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे सदस्य, ग्रामदैवत श्री डोळसनाथ महाराज मंदिर ट्रस्टचे विश्वस्त म्हणूनही त्यांनी काम पाहिले. ग्रामदैवत श्री डोळसनाथ महाराज उत्सव समितीचे ते माजी अध्यक्ष होते. शेती आणि विटभट्टी व्यवसायातही त्यांनी चांगले नाव कमावले होते. उद्योजक भरत भेगडे, गुलाब भेगडे आणि शरद भेगडे यांचे ते वडील होत.

निवृत्ती बाळोबा भेगडे यांची अंत्ययात्रा भेगडे आळी,खळवाडी येथून आज सकाळी 10 वाजता निघणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.