Talegaon Dabhade : इंद्रायणी महाविद्यालयात आंतरमहाविद्यालयीन पॉवरलिफ्टिंग स्पर्धेचे आयोजन

एमपीसी न्यूज – तळेगाव दाभाडे (Talegaon Dabhade) येथील इंद्रायणी महाविद्यालयात आंतरमहाविद्यालयीन पॉवरलिफ्टिंग (मुले, मुली) स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठांतर्गत पुणे जिल्हा विभागीय क्रीडा समिती व इंद्रायणी महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवार (दि. 6) व बुधवार (दि. 7) रोजी या स्पर्धा होणार आहेत.

मंगळवार दि. 6 रोजी सकाळी 10 वाजता स्पर्धेचे उद्घाटन इंद्रायणी विद्यामंदिर संस्थेचे अध्यक्ष व प्रसिद्ध उद्योजक रामदास काकडे यांच्या हस्ते इंद्रायणी महाविद्यालयाच्या सभागृहात होणार असून संस्थेचे कार्यवाह चंद्रकांत शेटे व अन्य पदाधिकारी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार असल्याची (Talegaon Dabhade) माहिती प्राचार्य डॉ. संभाजी मलघे यांनी दिली.

दोन दिवस चालणा-या मुलांमुलींच्या या स्पर्धेत पुणे जिल्ह्यातील विविध महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला असून आणखीही अनेक विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन इंद्रायणी महाविद्यालयाचे शारीरिक शिक्षण संचालक डॉ. सुरेश थरकुडे यांनी केले.

Pimpri News: मराठवाडा जनविकास संघ, मराठवाडा भूमिपूत्र पिंपरी-चिंचवड शहरतर्फे ‘पवित्र माती मंगल कलश संवाद’ यात्रेचे आयोजन

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.