Talegaon Dabhade: संतोष खांडगे यांनी वाढदिवसाचा खर्च टाळून केले ‘आर्सेनिक अल्बम’चे वाटप

Talegaon Dabhade: Santosh Khandge distributed 'Arsenic Album' by avoiding birthday expenses

एमपीसी न्यूज – तळेगाव दाभाडे येथील नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाचे सचिव व श्री डोळसनाथ  महाराज शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष व विविध संस्थावर आपल्या कार्यकर्तृत्त्वातून ठसा उमटविणारे अष्टपैलू व्यक्तिमत्त्व संतोष दत्तात्रय खांडगे यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त दरवर्षी आयोजित केला जाणारा अभीष्टचिंतन सोहळा या वर्षी रद्द करण्यात आला. 

देशव्यापी कोरोनाच्या संकटामुळे सामाजिक बांधिलकी जोपासत यावर्षीचा 51 वा वाढदिवस साजरा न करता इतर खर्चाला फाटा देत साध्या पद्धतीने साजरा केला.

कोरोनामुळे ओढवलेला प्रसंग लक्षात घेता या सर्वव्यापी संकटाच्या काळात कोरोनाला प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून भारत सरकारच्या आयुष मंत्रालयाने सुचविलेल्या अधिकृत ‘आर्सेनिक अल्बम’ या होमिओपॅथी औषधाचे विविध संस्थांना मोफत वाटप केले.

याप्रसंगी रोटरी एमआयडीसीचे अध्यक्ष गणेश काकडे, सचिव दशरथ जांभूळकर, डोळसनाथ महाराज शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव मिलिंद शेलार (सर), कार्याध्यक्ष बाळासाहेब शिंदे आदी  उपस्थित होते.

यावेळी नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळ, श्री डोळसनाथ महाराज शिक्षण प्रसारक मंडळ, स्वामी विवेकानंद इंग्लिश स्कूल, मावळ नागरी सहकारी पतसंस्था, रोटरी क्लब ऑफ तळेगाव एमआयडीसी, हॉलिडेज बजाज व केटीएम आणि समाजप्रेमी आप्पा प्रतिष्ठान या संस्थांच्या सर्व पदाधिकारी संचालक, मुख्याध्यापक, शिक्षक वृंद, कर्मचारी वर्ग यांसह अनेकांना औषधाचे वाटप करण्यात आले.

उत्सवमूर्ती संतोष खांडगे व पत्नी रजनीगंधा खांडगे यांनी या औषधाचे वाटप करताना सार्वजनिक स्वच्छता, सोशल डिस्टन्सिंग, मास्क व सॅनिटायझरचा वापर याचे सर्वांना महत्त्व सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.