Talegaon Dabhade : सरस्वती विद्या मंदिरचे स्नेहसंमेलन उत्साहात साजरे

एमपीसी न्यूज- इंदोरी येथील सरस्वती विद्या मंदिर शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात पार पडले.

या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून पंचायत समिती मावळचे सभापती गुलाबराव म्हाळसकर, उपसभापती शांताराम कदम, जि.प.सदस्य नितीन मराठे, रवींद्र भेगडे, भाजपा मावळ तालुका अध्यक्ष प्रशांत ढोरे, सरपंच कीर्ती पडवळ, उपसरपंच दिनेश चव्हाण सर्व ग्रामपंचायत सदस्य, सरस्वती शिक्षण संस्थेचे अध्यक्ष सुरेश झेंड व सर्व कार्यकारिणी सदस्य तसेच शाळेतील बालवाडी विभाग प्रमुख, मुख्याध्यापक शिक्षक उपस्थित होते.

व्यासपीठावरील मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन व सरस्वती पूजन करुन कार्यक्रमास सुरवात झाली. शाळेच्या विद्यार्थिनींनी स्वागत स्वागत गीताने पाहुण्यांचे स्वागत केले. या नंतर वार्षिक अहवाल वाचन वगुणवंत विद्यार्थ्यांचा बक्षीस वितरणाचा कार्यक्रम झाला.

गदिमा व पु. ल. देशपांडे यांचे जन्मशताब्दी वर्ष असल्याने त्यांना अभिवादन करुन विद्यार्थ्यांच्या विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम झाला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.