Talegaon Dabhade : परांजपे विद्यालयात दहावीच्या विद्यार्थ्यांना निरोप

एमपीसी न्यूज- पु वा परांजपे विद्यालय येथे दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ मंगळवारी (दि.१८) पार पडला. यावेळी दहावीच्या विद्यार्थ्यांनी शाळेविषयी कृतज्ञता व्यक्त केली.

अध्यक्षस्थानी माजी मुख्याध्यापक सोनबा गोपाळे होते. प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. शाळीग्राम भंडारी, चेअरमन महेश शाह उपनगराध्यक्षा वैशाली दाभाडे उपस्थित होते. दहावीच्या विद्यार्थ्यांनी विद्यालयातील सर्व अध्यापकांचा आदरपूर्वक उल्लेख केला.

डॉ. शाळीग्राम भंडारी म्हणाले, ” विद्यार्थ्यांनी आपलं ध्येय निश्चित ठरवावं प्रत्येकाने डॉक्टर, इंजिनियर होण्याचा अट्टाहास धरू नये आपणास ज्या क्षेत्रात जाण्याची आवड असेल तेच क्षेत्र निवडावे. सातत्य आणि गुरुजन पालक आणि मित्रांचे सहकार्य असेल तर आपण निश्चितच कोणत्याही विषयात प्रगती आणि प्राविण्य प्राप्त करू शकता” अनेक कविता दृष्टांत सादर करून विद्यार्थ्यांना विचार करण्यास प्रवृत्त केले.

महेश शाह, वैशाली दाभाडे यांनी दहावीच्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. गोपाळे गुरुजी यांनी शाळेविषयी कृतज्ञता व्यक्त करताना आपण याच शाळेचे माजी विद्यार्थी आहोत याचा मला सार्थ अभिमान वाटतो असे सांगितले.

दहावीच्या विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा अर्धाकृती पुतळा परांजपे विद्यालयाला भेट दिला . या कार्यक्रमासाठी शाळेचे पर्यवेक्षक भगवान शिंदे आणि मुख्याध्यापक राधाकृष्ण येणारे यांनी परिश्रम घेतले. प्रास्ताविक भगवान शिंदे सर यांनी केले आभार राधाकृष्ण येणारे यांनी मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.