Talegaon Dabhade : कृष्णराव भेगडे इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये क्रीडा सप्ताह उत्साहात संपन्न

एमपीसी न्यूज – कृष्णराव भेगडे इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये (Talegaon Dabhade) एक उत्साही क्रीडा सप्ताह उत्साहात संपन्न झाला. यामध्ये प्री प्रायमरी विभाग, प्राथमिक आणि माध्यमिक विभागातील सर्व विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. यामध्ये विविध खेळांचे आयोजन करण्यात आले होते.

नर्सरी ते सीनियर या गटासाठी बॉल पासिंग, झिगझॅक रनिंग, कोन कलेक्शन, गेट रेडी फॉर स्कूल, विठोबा जंप, फ्रॉग जंप अशा क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. इयत्ता पहिली ते चौथी या विद्यार्थ्यांसाठी धावण्याची शर्यत, दोरी उड्या, कलेक्टिंग बॉल या स्पर्धा घेण्यात आल्या. इयत्ता पाचवी ते दहावीतील विद्यार्थ्यांसाठी खो-खो, कबड्डी, व्हॉलीबॉल , लांब उडी, उंच उडी, बुद्धिबळ , कॅरम, धावण्याची शर्यत अशा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.

कबड्डी संघाच्या धोरणात्मक डावपेच तसेच खो-खो या पारंपारिक खेळाने या कार्यक्रमास सांस्कृतिक महत्त्व प्राप्त झाले. शाळेच्या क्रीडा सप्ताहाचे उद्दिष्ट केवळ शारीरिक तंदुरुस्तीला चालना देणे नव्हे , तर सांघिक कार्य, शिस्त आणि लवचिकता यासारख्या मूल्यांची (Talegaon Dabhade) उभारणी करणे हा आहे. याने विद्यार्थ्यांना विविध खेळांमध्ये त्यांची आवड जाणून घेण्यासाठी एक व्यासपीठ उपलब्ध करून दिले आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण दृष्टिकोनाला प्रोत्साहन दिले गेले.

Bavdhan : दुरुस्तीसाठी दिलेली कार परत न देता व्यवसायिकाची फसवणूक; एकावर गुन्हा दाखल

सर्व विद्यार्थ्यांनी खेळामध्ये उत्साह पूर्ण सहभाग दर्शविला. विद्यार्थ्यांकडून या सर्व स्पर्धांचा सराव शाळेचे क्रीडाशिक्षक सचिन आंद्रे व शिक्षिका सुवर्णा झणझणे यांनी घेतला. यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका मीना अय्यर तसेच शाळेचे सर्व शिक्षक , शाळेच्या पर्यवेक्षिका ज्योती सावंत, रमा बागुल, कीर्ती कुलकर्णी, मीरा चव्हाण उपस्थित होत्या.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.