_MPC_DIR_MPU_III -NEW PUN  21 JUN 2021

तळेगाव दाभाडे: फ्रेन्डस् ऑफ नेचर्सच्या अध्यक्षपदी सुपर्णा गायकवाड 

Talegaon Dabhade: Suparna Gaikwad elected as President of Friends of Nature

एमपीसी न्यूज – फ्रेंड्स ऑफ नेचर्स असोशिएशनच्या अध्यक्षपदी सुपर्णा गायकवाड यांची सर्वानुमते निवड करण्यात आल्याची माहिती फ्रेंड्स ऑफ नेचर्स असोशिएशनचे संस्थापक महेश महाजन यांनी दिली.

फ्रेंड्स ऑफ नेचर्स असोशिएशन तळेगाव दाभाडे या संस्थेच्या यशवंत नगर येथील त्यांच्या निसर्ग अभ्यासिकेच्या सभागृहात सोशल डिस्टंन्सिग पाळून झालेल्या सभेत हि निवड करण्यात आली. या सभेस फ्रेंड्स ऑफ नेचरचे माजी अध्यक्ष डॉ.गणेश सोरटे, विवेक रामायणे, सुनील गोडसे, अमित पोतदार, संस्थापक महेश महाजन, माजी सेक्रेटरी पौर्णिमा व्हटकर तसेच विश्वास देशपांडे, निशिकांत पंचवाघ आणि इतर सदस्य उपस्थित होते.

_MPC_DIR_MPU_II

 यावेळी सेक्रेटरी म्हणून जय गोरे, खजिनदार म्हणून अमित पोतदार आणि पीआरओ पदी नीरज शाही यांची  देखील निवड करण्यात आली.

 सुपर्णा गायकवाड यांची फ्रेंड्स ऑफ नेचर्स असोशिएशनच्या अध्यक्षपदी पुढील दोन वर्षांसाठी निवड करण्यात आली आहे.  सुपर्णा गायकवाड या एम.कॉम.बी.एड असून लोणावळा येथील डी.पी.मेहता ज्युनिअर कॉलेजमध्ये व्याख्यात्या म्हणून काम करत आहेत.  गायकवाड  यांनी यापूर्वी फ्रेंड्स ऑफ नेचरचे सेक्रेटरीपद भूषविले आहे. फ्रेंड्स ऑफ नेचर्सचे सर्व ट्रेकिंग अ‍ॅक्टीव्हीटी मध्ये त्यांचा सक्रीय सहभाग असतो.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.