Talegaon Dabhade : टिकाव आणि फावड्याने दोघांवर जीवघेणा हल्ला

एमपीसी न्यूज – बेकायदेशीर जमाव जमवून दोघांवर टिकाव आणि फावड्याने मारत जीवघेणा हल्ला केला. ही घटना सोमवारी (दि. 14) सकाळी साडेअकराच्या सुमारास मावळ तालुक्यातील बेबडओव्हळ येथे घडली.

प्रवीण त्रिंबक घारे (वय 30, रा. बेबडओव्हळ, ता. मावळ) यांनी याप्रकरणी तळेगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार रवी घारे, बंटी घारे, कालीचरण घारे, शंकर घारे, संतोष घारे (सर्व रा. बेबडओव्हळ, ता. मावळ) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी आणि राजकुमार पिंगळे हे दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी सकाळी आरोपींनी फिर्यादी प्रवीण यांच्या घरासमोर बेकायदेशीर जमाव जमवला. राजकुमार पिंगळे यांच्या डोक्यात रवी घारे याने फावडे मारले. तर बंटी घारे याने टिकावाने मारले. यामध्ये राजकुमार गंभीर जखमी झाले. हे भांडण सोडविण्यासाठी फिर्यादी प्रवीण गेले असता त्यांनाही जीवे मारण्याच्या उद्देशाने फावड्याने मारहाण केली. ते देखील गंभीर जखमी झाले. सर्व आरोपींनी शिवीगाळ करत लथाबुक्क्यांनी मारहाण केली. यावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तळेगाव पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.