Chikhali : कच्चा माल विकण्याच्या बहाण्याने व्यावसायिकाची 95 लाखांची फसवणूक

एमपीसी न्यूज – कंपनीत शिल्लक असलेला कच्चा माल विकून देतो, असे आमिष दाखवून तीन जणांनी मिळून एका व्यावसायिकाची 94 लाख 80 हजार 285 रुपयांची फसवणूक केली. हा प्रकार देहू-आळंदी रोड चिखली येथील सप्तसतिज इंडस्ट्रीज प्रा. लि. आणि सप्तसतिज मेटाटेक प्रा. लि. या कंपनीत 22 सप्टेंबर 2016 ते 22 ऑक्टोबर 2017 या कालावधीत घडला.

लीलाधर जगन्नाथ बराडे (वय 53, रा. शिवतेज नगर, चिंचवड) यांनी याप्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार प्रकाश पारेकर, निखिल दत्ता लवटे, प्रमोद बिरादार यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी लीलाधर यांची देहू-आळंदी रोडवर चिखली येथे सप्तसतिज नावाची कंपनी आहे. कंपनीतील कच्च्या मालाची डी-कॉयलिंग अँड शेअरिंग प्रक्रिया करून देतो. तसेच कंपनीत अतिरिक्त साठा असलेला कच्चा माल विकून त्याचे पैसे 60 दिवसात देतो, असे सांगून कंपनीतील कच्चा माल घेतला. त्याची खोट्या कंपन्यांच्या नावावर बनावट बिले तयार करण्यास सांगितले. एकूण 94 लाख 80 हजार 285 रुपयांचा अतिरिक्त कच्चा माल घेऊन लीलाधर यांना त्याचा परतावा दिला नाही. यावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक (गुन्हे) शंकर आवताडे तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.