Talegaon Dabhde : माईर्स भौतिकोपचार महाविद्यालयात राज्यस्तरीय ‘भौतिकोपचार परिषद‘

एमपीसी न्यूज- माईर्स भौतिकोपचार महाविद्यालय व डॉ भाऊसाहेब सरदेसाई तळेगाव ग्रामीण रुग्णालय यांच्या वतीने नुकतीच राज्यस्तरीय भौतिकोपचार परिषद ‘कायनेसिओकॉन– मुव्हींग टुवर्स टुमॉरो ‘ संपन्न झाली. परिषदेचा विषय अपडेट्स ईन स्पोर्ट्स सायन्स अँड फिजीओथेरेपी असा होता. या परिषदेला राज्यातील वेगवेगळ्या भौतिकोपचार महाविद्यालयातील सुमारे दोनशे भौतिकोपचारतज्ञ व विद्यार्थी सहभागी झाले होते.

परिषदेची सुरुवात भौतिकोपचारतज्ञ व विद्यार्थ्यांच्या शोधनिबंध सादरीकरणाने झाली. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र राज्य व्यवसायोपचार व भौतिकोपचार परिषदेचे अध्यक्ष डॉ सुदीप काळे उपस्थित होते. अध्यक्षस्थानी संस्थेच्या कार्यकारी संचालिका डॉ सुचित्रा नागरे होत्या. एम आय टी शिक्षण समुहाचे वैद्यकीय शिक्षण संशोधन व पदव्युत्तर शिक्षण संचालक डॉ अरूण जामकर, संचालक उच्च शिक्षण आणि एमआयएमईआर वैद्यकिय महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ राजेंद्रप्रसाद गुप्ता ह्यांनी मार्गदर्शनपर भाषण केले. डॉ सुदीप काळे ह्यांनी भौतिकोपचार मधील न्यायवैद्यक बाबींबद्दल विद्यार्थ्याना मार्गदर्शन केले तसेच कार्यकारी संचालिका,डॉ सुचित्रा नागरे ह्यांचे अध्यक्षीय भाषण झाले.

दुपारच्या सत्रात लेफ्टनंट कर्नल डॉ. तानाजी वानखेडे , डॉ गीता धर्मट्टी , डॉ वाबिज़ भरुचा आणि डॉ आलाप जावडेकर ह्यांनी स्पोर्ट्स फिजीओथेरेपी ह्या विषयावर उपस्थितांना मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्या डॉ स्नेहल घोडे यांनी केले. सुत्रसंचालन डॉ पूजा गुळूंजकर यांनी तर आभार डॉ सायली पाळधीकर यांनी मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.