Talegaon News : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारची सात वर्ष पूर्ण झाल्याबद्दल रुग्णवाहिका चालकांचा सत्कार

एमपीसी न्यूज – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारची सात वर्ष पूर्ण झाल्याबद्दल तळेगाव दाभाडे शहर भाजपच्या वतीने रुग्णवाहिका चालकांचा सत्कार करण्यात आला.

कोरोनाच्या संक्रमणाच्या काळात आपल्या जिवाची व आपल्या कुटुंबाची पर्वा न करता अहोरात्र काम करणाऱ्या रुग्णवाहिका चालकांचा पोशाख, शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.

याप्रसंगी माजी राज्यमंत्री बाळा भेगडे, पुणे जिल्हा अध्यक्ष गणेश भेगडे, नगराध्यक्ष चित्रा जगनाडे, गटनेते अरूण भेगडे पाटील, नगरसेविका शोभा भेगडे, नगरसेवक संतोष दाभाडे पाटील, माजी नगरसेवक सचिन टकले,खजिनदार सतिश राऊत, महेश सोनपावले, कामगार आघाडी अध्यक्ष अशोक दाभाडे, युवा मोर्चा अध्यक्ष अक्षय भेगडे, सर्व आघाड्यांचे प्रमुख उपस्थित होते.

कार्यक्रमाचे नियोजन सरचिटणीस प्रदीप गटे, रविंद्र साबळे, विनायक भेगडे, रजनी ठाकुर, शोभा परदेशी यांनी केले.यावेळी प्रास्तविक शहराध्यक्ष रविंद्र माने यांनी केले. नगरसेवक संतोष दाभाडे पाटील व नगराध्यक्षा चित्रा जगनाडे यांनी मनोगत व्यक्त केले.

रुग्णवाहिका चालकांच्या वतीने प्रातिनिधीक अनुभव कथन परमेश्वर वाघमारे यांनी केले. कार्यक्रमाचा समारोप माजी राज्यमंत्री संजय ऊर्फ बाळा भेगडे यांच्या भाषणाने झाला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.