Talegaon News : कलापिनीचे ज्येष्ठ सदस्य अप्पा धोपावकर यांचे निधन

एमपीसी न्यूज – कलापिनी परिवारातील जेष्ठ सदस्य नागेश रामकृष्ण तथा अप्पा धोपावकर यांचे आज दि. 26 जुलै 2021 रोजी अल्पशा आजाराने निधन झाले ते 92 वर्षाचे होते.

अप्पा धोपावकर कलापिनीचे कलापिनीचे जुने आजीव सदस्य व कलापिनीचे पितामह असलेल्या अ‍ॅड.पु. वा. तथा दादासाहेब परांजपे यांचे जवळचे मित्र होते.

कलापिनीला अप्पा धोपावकर यांनी वेळोवेळी अनेक देणग्या दिल्या आहेत. त्यांची पत्नी कै. रजनी धोपावकर यांच्या स्मृती प्रित्यर्थ दिलेल्या देणगीतून कलापिनीत दरवर्षी कै.रजनी धोपावकर स्मृतीपुष्प कार्यक्रम आयोजित केला जातो. अप्पा धोपावकर कलापिनीच्या स्वास्थ्य योगाचे संस्थापक सदस्य होते. स्वास्थ्ययोगामुळे आयुष्य आनंदाने आणि आरोग्यमयी जगता येते याचे अप्पा स्वत: एक उदाहरण होते. रोज सकाळी स्वास्थ्य योगात हजेरी लावून हास्य आणि व्यायामाचे टॉनिक घेऊन हसत खेळत जगणारे अप्पा धोपावकर कलापिनी परिवारासाठी प्रेरणादायक होते.

 

तळेगावातील ज्येष्ठ नागरिक संघामध्ये तसेच साहित्य काव्य मंडळातही अप्पा सक्रिय होते, यशवंतनगरमधील ज्येष्ठ नागरिक संघाचे ते अंतर्गत हिशोब तपासनीस होते.

 

-MPC-BOTTOM-BANNER-I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

.