Talegaon News : तळेगाव दाभाडे नगरीच्या प्रवेशद्वारावर वृक्षारोपण आणि रोटरी क्लब ऑफ तळेगाव सिटीच्या फलकाचे अनावरण 

एमपीसी न्यूज – रोटरी क्लब तळेगाव सिटी व जागरूक कट्टा यांच्या संयुक्त विद्यमाने ज्या तळेगाव दाभाडे नगरीचे प्रवेशद्वार हे लिंब फाटा या नावाने ओळखले जाते त्या ठिकाणी कडुलिंबाची तीन वृक्षांची लागवड करण्यात आली, जुने कडुलिंबाचे झाड हे रस्ता रुंदीकरणात गेले होते. तसेच रोटरी क्लब ऑफ तळेगाव सिटीच्या फलकाचे अनावरण संस्थापक अध्यक्ष राे विलास काळोखे यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी रोटरी क्लब ऑफ तळेगाव दाभाडे सिटीचे सदस्य,जागरूक कट्ट्याचे सदस्य, सामाजिक कार्यकर्ते दिलीप डोळस, विवेकानंद योगा ग्रुपचे निसर्गप्रेमी उपस्थित होते.

कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी राे.विलास काळोखे,राे.संजय मेहता, राे.सुरेश दाभाडे, राे.दीपक फल्ले, राे.वैशाली खळदे, राे.शाईन शेख, राे.संतोष परदेशी, राे.बाळासाहेब रिकामे,राे.तानाजी मराठे, राे.विश्वास कदम, व, विवेकानंद योगा ग्रुप चे सदस्य, विश्वनाथ काळोखे, प्रदीप साठे,भरत पोदार,शरद शुक्ला,नाना दळवी व निसर्ग मित्र राे.सुनील महाजन यांनी सहभाग घेतला.

प्रास्ताविक सुरेश दाभाडे यांनी केले व आभार दीपक फल्ले यांनी मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.