Talegaon News: पार्थ पवार फौंडेशन व जनसेवा विकास समितीच्या मोफत लसीकरण केंद्राला पोलीस आयुक्तांची भेट

एमपीसी न्यूज – पार्थ पवार फौंडेशन व जनसेवा विकास समितीच्या वतीने अथर्व हॉस्पिटल येथे सुरू करण्यात आलेल्या मोफत लसीकरण केंद्राला पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी भेट दिली.

_MPC_DIR_MPU_II

पार्थ पवार फौंडेशन व जनसेवा विकास समितीच्या वतीने अथर्व हॉस्पिटल व पायोनियर हॉस्पिटल येथे  मोफत कोरोना प्रतिबंधक लसीकरण केंद्र  सुरू करण्यात आले आहे. पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी अथर्व हॉस्पिटल येथील लसीकरण केंद्राला भेट देऊन लसीकरण मोहिमेची माहिती घेतली . या वेळी काही नागरिकांना आयुक्त कृष्ण प्रकाश साहेब यांचे उपस्थितीत लस देण्यात आली.

अथर्व हॉस्पिटल प्रशासनाच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन या वेळी करण्यात आले. आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी आपल्या भाषणात पार्थ पवार व किशोर आवारे यांच्या लसीकरण मोहिमेला शुभेच्छा दिल्या. महाभारतातील प्रसंगांचे अनेक दाखले देत कृष्ण प्रकाश साहेब यांनी उपस्थितांची मने जिंकली.

जनसेवा विकास समितीचे प्रवक्ते मिलिंद अच्युत यांनी लसीकरणाची विस्तृत माहिती दिली. स्त्री शक्ती भाजी व फ्रुट मार्केट संपूर्ण लसीकृत झाले असून किशोर आवारे यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण तळेगाव शहर लसीकृत करणार असल्याचे मिलिंद अच्युत यांनी नमूद केले.

अथर्व हॉस्पिटलचे संचालक डॉ. अजित माने यांनी करोनाच्या नवीन लाटेविषयी माहिती दिली.

या वेळी जिल्हा आरोग्य अधोकारी चंद्रकांत लोहरे , लोकमत वृत्तसमूहाचे वार्ताहर विलास भेगडे व आवाज वृत्तवाहिनीच्या रेश्मा फडतरे यांचा विशेष सत्कार आयुक्त कृष्ण प्रकाश यांचे हस्ते करण्यात आला. पार्थ पवार फौंडेशनचे सत्यम खांडगे यांनी आभार मानले.

या वेळी डॉ राजेंद्र देशमुख, अनिल धर्माधिकारी, अविनाश बोडके, कल्पेश भगत, सुनील पवार, ऋषी अरोरा तसेच अथर्व हॉस्पिटलचे सर्व डॉक्टर्स व कर्मचारी उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.