_MPC_DIR_MPU_III

Talegaon News : तळेगाव दाभाडे पोलीस महिला दक्षता समितीच्या अध्यक्षपदी वैशाली दाभाडे

एमपीसी न्यूज – तळेगाव नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्षा वैशाली प्रमोद दाभाडे यांची पिंपरी चिंचवड आयुक्तालय अंतर्गत तळेगाव दाभाडे पोलीस महिला दक्षता समिती (भरोसा सेल) च्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

_MPC_DIR_MPU_IV

तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक डाॅ. अमरनाथ वाघमोडे यांनी सोमवार (दि. 19) रोजी महिला समितीच्या सदस्या माजी नगराध्यक्षा माया भेगडे, वीणा करंडे, ज्योती शिंदे, निशा पवार, नगरसेविका मंगल भेगडे, शैलजा काळोखे, राजश्री भेगडे, शिवानी सोनावणे व पोलीस नाईक प्रशांत वाबळे आदींच्या उपस्थितीत दाभाडे यांना नियुक्तीचे पत्र दिले.

_MPC_DIR_MPU_II

वैशाली दाभाडे या पुणे जिल्हा महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या सरचिटणीस असून कुशल संघटक म्हणून सुपरिचित आहेत.

तळेगाव दाभाडे भागातील महिलांना दक्षता समितीच्या माध्यमातून न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील राहण्याचा मनोदय दाभाडे यांनी यावेळी व्यक्त केला.

_MPC_DIR_MPU_I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.