Talegaon : हातभट्टीवर दारू करण्याचे अडीज लाखाचे रसायन पोलिसांच्या ताब्यात

एमपीसी न्यूज : हातभट्टीवर (Talegaon) दारू करण्याचे 2.51 लाख रुपये किंमतीचे रसायन पोलिसांनी हस्तगत केले आहे. काल 5 जुलै रोजी आंबी गावच्या हद्दीत हि घटना घडली.

Petrocard : महापालिका वाहनांमध्ये इंधन भरण्याकरीता आता पेट्रोकार्ड कॅशलेस सुविधा

आरोपी महिलेने अनधिकाराने बेकायदेशीररित्या हातभट्टी दारू तयार करण्याकरिता रसायन भिजत लावून हातभट्टी दारू काढत असताना पोलीस घटनास्थळी पोहोचले. तिला पकडण्याचा प्रयत्न केला असता ती पळून गेली. तेथील 2.51 लाख किंमतीचे साहित्य हस्तगत करण्यात आले आहे. आरोपी विरोधात महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम (Talegaon) कलम 65(ख)(ग)(च) अन्वये तळेगाव एमआयडीसी पोलूस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.