Talegaon : ट्रान्सफॉर्मर मधून तांब्याच्या कॉईल चोरीला

एमपीसी न्यूज – विहिरीजवळ बसवण्यात आलेल्या ट्रान्सफॉर्मर (Talegaon) मधून 72 हजार रुपये किमतीच्या तांब्याच्या कॉईल अज्ञातांनी चोरून नेल्या. ही घटना 2 ऑगस्ट रोजी मावळ तालुक्यातील गोळेवाडी येथे उघडकीस आली.

विश्वास मधुकर दळवी (वय 56, रा. चिंचवड) यांनी याप्रकरणी तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची गोळेवाडी येथे जमीन आहे. तिथे असलेल्या विहिरीजवळ त्यांनी ट्रान्सफॉर्मर बसवला आहे. अज्ञातांनी 31 जुलै ते दोन ऑगस्ट या कालावधीत ट्रान्सफॉर्मरचे नट बोल्ट खोलून त्यातील 240 किलो वजनाच्या 72 हजार रुपये किमतीच्या तांब्याच्या कॉइल चोरून नेल्या.

Pimpri : कंटेनरला रिक्षाची धडक; चालकाचा मृत्यू

तसेच ट्रान्सफॉर्मर मधील 300 ते 400 किलो लिटर ऑइल सांडून (Talegaon) नुकसान गेले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. तळेगाव एमआयडीसी पोलीस तपास करीत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.