Pimpri : चोरट्यांनी 90 हजारांचे आठ मोबाईल केले लंपास; संबंधित पोलीस ठाण्यात चार गुन्हे दाखल

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरात घरफोडी करून तसेच उघड्या दरवाजावाटे घरात प्रवेश करून मोबाईल फोन चोरून नेण्याच्या घटना वारंवार उघडकीस येत आहेत. तळेगाव एमआयडीसी, भोसरी आणि निगडी परिसरातून 90 हजारांचे आठ मोबाईल चोरीला गेल्याप्रकरणी शनिवारी (दि. 1) संबंधित पोलीस ठाण्यात चार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

मोबाईल चोरीचा पहिला प्रकार मावळ तालुक्यातील नवलाख उंब्रे येथे 5 जानेवारी रोजी दुपारी अडीच ते चारच्या दरम्यान घडला. याप्रकरणी सनी व्यारा शर्मा (वय 23, रा. नवलाख उंब्रे, ता. मावळ) यांनी तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी घरात झोपलेले असताना चोरट्याने दरवाजा ढकलून घरात प्रवेश केला. घरातील सात हजार रुपये कमितीचा मोबाइल चोरून नेला. तळेगाव एमआयडीसी पोलीस तपास करीत आहेत.

_MPC_DIR_MPU_II

मोबाईल चोरीचा दुसरा प्रकार नवलाख उंब्रे येथे 29 डिसेंबर 2019 रोजी सकाळी साडेआठच्या सुमारास घडला. याप्रकरणी मोहम्मद सय्यद राजा (वय 24, रा. नवलाख उंबे्र) यांनी तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी राजा घरात झोपलेले असताना अज्ञात चोरट्याने पाच हजारांचा मोबाइल चोरून नेला. तळेगाव एमआयडीसी पोलीस तपास करीत आहेत.

मोबाईल चोरीचा तिसरा प्रकार पांढरकरवस्ती, आकुर्डी येथे मंगळवारी (दि. 28) रात्री साडेबारा ते अडीचच्या दरम्यान घडला. याप्रकरणी संदीप गणेश पंडीत (वय 35, रा. पांढरकर वस्ती, आकुर्डी) यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी पंडीत यांचे घर बंद असताना चोरट्याने कशाच्या तरी सहाय्याने घराचा दरवाजा उघडला. घरात प्रवेश करून घरातील 36 हजार रुपये किमतीचे चार मोबाइल चोरी करून नेले. निगडी पोलीस तपास करीत आहेत.

मोबाईल चोरीचा चौथा प्रकार चक्रपाणी वसाहत, भोसरी येथे शनिवारी (दि. 1) पहाटे साडेपाच ते दुपारी पावणे चारच्या दरम्यान घडला. याप्रकरणी अमोल जिजाराम रोकडे (वय 25, रा. संत ज्ञानेश्वर नगर, चक्रपाणी वसाहत, भोसरी) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी रोकडे कामास गेले होते. त्यावेळी त्यांनी रुममध्ये ठेवलेली कपड्याची सॅक व त्यात ठेवलेले कागदपत्रे तसेच 41 हजार रुपये किमतीचे मोबाइल फोन व फिर्यादी यांचा रुम पार्टनर अंकुश रत्नपारखे यांचा मोबाइल फोन चोरट्याने चोरून नेले. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.