Tata Motors : टोकियो ऑलम्पिकमध्ये मेडल हुकलेल्या खेळाडूंचा टाटा करणार सन्मान

एमपीसी न्यूज – नुकत्याच पार पडलेल्या टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताने सात पदक मिळवली. त्यात नीरज चोप्राने भालाफेकीत सूवर्ण पदक मिळवले आहे. पण, काही खेळाडूंचे कास्य पदक थोडक्यात हुकले. आता या खेळाडूंचा सत्कार टाटा मोटर्सने करणार असल्याचे जाहीर केले आहे. टाटा मोटर्स या खेळाडूंना अल्ट्रॉज (प्रमियम हॅच) ही कार भेट देणार आहे.

खेळाडूंनी पदक गमावलं असलं तरी देशाची मान उंचावली आहे. तसेच, मेहनत आणि कष्टाची उंची दाखवून तिथंपर्यंतचा प्रवास पूर्ण केला आहे. त्यांनी अनेक नवोदित खेळाडूंना प्रेरणा मिळेल त्यामुळे त्यांचा सन्मान करण्याचे कंपनीने ठरवले आहे.

टाटा मोटर्स पॅसेंजर व्हेईकल विभागाचे अध्यक्ष शैलेश चंद्रा म्हणाले, ‘भारतीय खेळाडूंनी टोकियो ऑलम्पिकमध्ये दाखवलेला जोश आणि प्रयत्न सर्व भारतीयांनी पाहीले आहेत. दडपणाखाली जगातील सर्वेात्तम खेळाडूंशी भिडताना काही भारतीय खेळाडू पदकापासून वंचित राहिले. त्यांचे पदकं हुकले असेल पण या खेऴाडूंनी करोडो भारतीयांच्या मनात घर निर्माण केले आहे. तसेच, यामुळे लाखो उभरत्या खेळाडूंना प्रेरणा मिळाली आहे. त्यामुळे या खेळाडूंचा अल्ट्रॉज (प्रमियम हॅच) ही कार भेट देऊन सन्मान करायचे टाटाने ठरवले आहे. असे शैलेश चंद्रा म्हणाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.